शंभर कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या तपासनीसांचे काम कौतुकास्पद - नरेंद्र पवार

By अनिकेत घमंडी | Published: August 21, 2023 02:03 PM2023-08-21T14:03:35+5:302023-08-21T14:04:00+5:30

वरिष्ठ नागरिक संघातर्फे कल्याण स्टेशन मास्तर कार्यालयात सोमवारी आयोजित केलेल्या उत्कृष्ट तपासनीसांच्या सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 

The work of the investigators who have generated income of 100 crore rupees is commendable - Narendra Pawar | शंभर कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या तपासनीसांचे काम कौतुकास्पद - नरेंद्र पवार

शंभर कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या तपासनीसांचे काम कौतुकास्पद - नरेंद्र पवार

googlenewsNext

कल्याण : भारतीय रेल्वेला अवघ्या एका वर्षात शंभर कोटींचे रुपयांचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या तिकीट तपासनीसांचे काम अतिशय कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार माजी आमदार नरेंद्र पवार यांनी काढले. वरिष्ठ नागरिक संघातर्फे कल्याण स्टेशन मास्तर कार्यालयात सोमवारी आयोजित केलेल्या उत्कृष्ट तपासनीसांच्या सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 

रेल्वे प्रशासनाच्या मुंबई मंडळ तिकीट चेकींग स्टाफसाठी गेल्या वर्षाचा कालावधी अतिशय लक्षवेधी ठरला. अवघ्या एका वर्षात या तिकीट चेकिंग स्टाफने एसी लोकलसह नियमीत लोकलमध्येही परिणामकारक चेकिंग वाढवली. ज्यामुळे मुंबई मंडळ तिकीट चेकींग स्टाफकडून रेल्वेला शंभर कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. ही आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद बाब असल्याचे सांगत मुंबई मंडळ तिकीट स्टाफच्या कामगिरीचा आलेख असाच उंचावत जाईल अशा शब्दांत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कौतुक केले. 

यावेळी पवार यांच्या हस्ते तिकीट तपासनीसांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. या सन्मान सोहळ्याला मुंबई विभागाचे सिनियर डीसीएम बी. अरुण कुमार, डीसीटीआय नागेश संकपाळ, वरिष्ठ नागरिक संघाचे एस.आर. मुरहे, एस.के.श्रीवास्तव, मोहम्मद रफीक, सरदार आर. एस. भुसारी, श्रीकांत गरे, मंगेश भोसले, जी. के. ठोंबरे, सूत्रसंचालक डी.व्ही. रमण, शशांक दीक्षित यांच्यासह मुंबई मंडळाचे तिकीट तपासनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Web Title: The work of the investigators who have generated income of 100 crore rupees is commendable - Narendra Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण