आगामी काळात कोणत्याही सणावर निर्बंध नाही, CM पुत्राने दिलं आश्वासन
By मुरलीधर भवार | Published: August 28, 2022 09:08 PM2022-08-28T21:08:51+5:302022-08-28T21:11:33+5:30
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याकरीता 350 बसेस कल्याण डोंबिवलीतून रवाना. मोफत बस प्रवासामुळे चारमान्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
कल्याण - कोरोना काळातील र्निबधामुळे कोकणात गणपती उत्सवास मुंबईतील चाकरमान्यांना जाता आले नाही. या आधीचे सरकार हिंदूच्या सणावर र्निबध लादत होते. मात्र काही सण साजरे करण्यास मुभा देत होते. आत्ता शिंदे सरकारने सगळ्या सणांवरील र्निबद उठवले आहे. त्यामुळे दहीहंडीचा उत्सव जोरात साजरा जाला. येणा:या काळात गणपती असो किंवा नवरात्र, दिवाळी सणासह शिवजयंती जोरात साजरी केली जाईल. कोणत्याही सणावर र्निबध लादले जाणार नाही अशी ग्वाही कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.
कल्याण लोकसभा मतदार संघात राहणाऱ्या कोकणवासियांनी गणेशोत्सव सणाला कोकणात जाता यावे करीता मोफत बस सेवा खासदार शिंदे यांच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात आली. कल्याण, डोंबिवली, दिवा, कल्याण ग्रामीण याभागातील चाकरमान्यांकरीता 350 बसेस सोडण्यात आल्या. कल्याण पूर्व भागातील महापालिकेच्या ड प्रभाग कार्यालयापासून कल्याण मालवण या पहिल्या बसला खासदार शिंदे यांनी भगवा झेंडा दाखवून बस गाडी मार्गस्थ केली. याप्रसंगी आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेनेचे प्रशांत काळे, निलेश शिंदे, रवी पाटील, विशाल पावशे, अरुण आशाण, माधूरी काळे आदी मान्यवर उपस्थीत होते.
कोकणात प्रवाशांना नेणाऱ्या बस गाडी चालकाना खासदार शिंदे यांनी आवाहन केले की, बस योग्य प्रकारे चालवून प्रवाशांना इच्छीत स्थळी पोहचविण्याची काळजी घ्या. मागच्या वर्षीही कल्याण डोंबिवलीतून मोफत बस गाडय़ा सोडल्या होत्या. त्या तुलनेत यंदाच्या वर्षी जास्तीच्या बस गाडय़ा सोडल्या आहे. चाकरमान्यांचे आर्थिक कंबरडे आधीच कोरोनामुळे मोडले आहे. त्यांना कोकणात मोफत जाता यावा यासाटी त्यांच्याकरीता मोफत बस गाडय़ा उपलब्ध करुन दिल्या. त्यांचा प्रवास मोफत होत असल्याने त्यांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलले होते. रांगेत लावलेल्या बसेसच्या ठिकाणी चाकरमान्यांनी एकच गर्दी केली होती. कोकणासह सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील गणेश भक्तांना गणोशोत्सव साजरा करण्यासाठी मोफत बस गाडय़ा उपलब्ध करण्यात आल्या होत्या.