मतदारसंघाची मागणी करणं यात गैर काही नाही, वरिष्ठांनी ठरवलं तर आम्ही त्यांचं काम करू - कपिल पाटील

By मुरलीधर भवार | Published: April 6, 2024 08:05 PM2024-04-06T20:05:54+5:302024-04-06T20:06:21+5:30

महायुतीच्या उमेदवारासमोर कोणी कितीही आव्हान उभे केले तरी आमचे जे नेतृत्व आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमचाय सगळ्या महायुतीचे नेते आहे असं कपिल पाटील म्हणाले.

There is nothing wrong in demanding a constituency, if the seniors decide, we will do their work - Kapil Patil | मतदारसंघाची मागणी करणं यात गैर काही नाही, वरिष्ठांनी ठरवलं तर आम्ही त्यांचं काम करू - कपिल पाटील

मतदारसंघाची मागणी करणं यात गैर काही नाही, वरिष्ठांनी ठरवलं तर आम्ही त्यांचं काम करू - कपिल पाटील

कल्याण - भिवंडी लोकसभा मतदार संघाची मागणी शिवसेनेने केली आहे. त्यांनी मागणी करणे काही एक गैर नाही. आमचा पक्ष भाजपपेक्षा त्यांच्या पक्षाची ताकद जास्त आहे असे त्यांना वाटत आहे. दहा वर्षे आम्ही भाजपचे काम केले आहे. आत्ता ती जागा आम्हाला द्यावी असी त्यांची मागणी आहे. यात काही गैर नाही. आमचे महायुतीचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित दादा, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, सुनिल तटकरे आहे. यांच्या समन्वयाच्या बैठकीत आमच्या सहकाऱ्यांना ती जागा शिवसेनाला मिळाली तर दहा वर्षे त्यांनी आमचे काम केले. आत्ता आम्ही त्याचे काम करु. यात चुकीचे काय ? लोकशाहीत त्यांनी जागा मागितली आहे. त्यात चुकीचे काही नाही. देशाचे आणि राज्याचे शीर्ष नेतृत्व हे निर्णय करतील अशी समंजस प्रतिक्रिया खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केली आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशन आणि कल्याण संस्कृती मंच यांच्या वतीने कल्याणच्या काळा तलाव येथील प्रभू श्रीरामाची महाआरती आज सायंकाळी आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमास खासदार पाटील उपस्थित होते. विशेष म्हणजे या ठिकाणी भाजप आमदार किसन कथोरे हे देखील उपस्थित होते. पाटील आणि कथोरे यांनी हस्तांदोलन केले. यावेळी सगळ्यांची भुवया उंचावल्या.

चोरगे यांच्या विषयी सहानुभूतीची
यावेळी खासदार पाटील यांनी सांगितले की, काँग्रेसचे दयानंद चोरगे यांनी अपक्ष अर्ज भरणार आहेत. या मुद्यावर आपण काय भाष्य करणार.त्यांच्या पक्षात काय चालले आहे. ते त्या लोकांनी बघितले पाहिजे. एकंदरीतच ज्या काही भावना काँग्रेसच्या सहकारी वर्गाने व्यक्त केल्या आहेत. कोणालाही असे वाटणे सहाजिकच आहे. पाच वर्षे आम्ही पक्षाचे काम मरमर करतो. आणि आयत्या वेळी कोणाला तरी घेऊन उमेदवारी दिली जाते. आत्ता तर असे झाले की पक्षाला जी उमेदवारी होती तीच बदलली. ही जागा राष्ट्रवादीला गेली. त्यांच्या भावना तीव्र आहे. त्यात चुकीचे असे मला काही वाटत नाही.

काेणतेही आव्हान आहे असे मला वाटत नाही
खासदार पाटील यांनी सांगितले की, मला ज्या पक्षाने उमेदवारी दिली आहे. भाजपचे मित्र पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय बाकीचे घटक दल आहेत. हे सगळया महायुतीचा मी उमेदवार आहे. दोन वेळा महायुतीचाच उमेदवार होतो. महायुतीच्या उमेदवारासमोर कोणी कितीही आव्हान उभे केले तरी आमचे जे नेतृत्व आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमचाय सगळ्या महायुतीचे नेते आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूका लढतो. मोदीजींना देशात केलेले काम आहे. त्या कामाच्यामुळे समोर असलेल्या कोणत्या उमेदवारेच आव्हान आहे असे आम्हाला वाटत नाही. कारण मोदी जी च्या कामावर जनतेचा विश्वास आहे. त्या विश्वासाच्या माध्यमातून जनता निश्चात पणाने मला निवडून देईल असा दावा कपिल पाटील यांनी केला आहे.

कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे याचे नाव देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केले. ही केवळ औपचारीकता होती. हे तर काळ्या दगडावरची रेघ आहे. कल्याण लोकसभेत खासदारडॉ. श्रीकांत शिंदे हे उमेदवार आहेत. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत होता. म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहिर केली असे पाटील यांनी सांगितले.

कल्याण पूर्वेतील भाजप कार्यकर्त्यांनी लोकसभेची उमेदवारी भाजला द्यावी अशी मागणी केली आहे याविषयी खासदार पाटील यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, या विषयी मला काही माहिती नाही. माझ्या वाचनात आले. पेपरमध्ये वाचले. त्याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्यावर भाष्य करणे योग्य नाही. पण एकदा आपल्या नेत्यांनी युती केल्यानंतर कोणीही अशा प्रकारची भूमिीका घेणे. पक्षात असलेल्या कार्यकर्त्या नेत्यांनी अशा प्रकारची भूमिका घेणे उचित नाही. आपल्या काही भावना असतील तर आपल्या नेत्यांपर्यंत पोचविल्या पाहिजेत. महायुतीच्या नेत्यांच्या समन्वयांतून जी काही समस्या असेल तिचे निराकरण केले पाहिजे. जाहिरपणे अशा प्रकारची वाच्यता करणे उचित नाही. भाजप असो की, शिवसेना असो आपली महायुती आहे. महायुती हे आपले कुटुंब आहे. आपल्या कुटुंबात त्याची चर्चा होणे गरजेचे आहे.

 

Web Title: There is nothing wrong in demanding a constituency, if the seniors decide, we will do their work - Kapil Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.