"उबाठा गटाच्या लोकांना कॉफी, सँडविच द्यायलाही माणसं उरणार नाहीत", आदित्य ठाकरेंवर टीका

By मुरलीधर भवार | Published: February 9, 2024 05:21 PM2024-02-09T17:21:44+5:302024-02-09T17:23:26+5:30

शिवसेना शिंदे गटाचे युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांचा हल्लाबोल

"There will be no people left to give coffee, sandwiches to people of Ubhata group", criticizes Aditya Thackeray | "उबाठा गटाच्या लोकांना कॉफी, सँडविच द्यायलाही माणसं उरणार नाहीत", आदित्य ठाकरेंवर टीका

"उबाठा गटाच्या लोकांना कॉफी, सँडविच द्यायलाही माणसं उरणार नाहीत", आदित्य ठाकरेंवर टीका

मुरलीधर भवार, कल्याण : उबाठा गटाच्या लोकांना कॉफी आणि सँडविच द्यायला पण कुणी माणसं उरणार नाहीत अशी टीपणी करीत विकासावर बोलावे, सँडविच आणि कॉफीवर बोलून सहानुभूती मिळवण्याचा काम करू नये, अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यानी द्वारली येथील जागेच्या वादातून हिललाईन पोलिस ठाण्यात शिवसेना शिदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर गुरुवारी शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे हे कल्याणमध्ये आले होते. कल्याणमध्ये आलो की, मला कोल्ड कॉफी आणि सँडविचची आठवण होते असे वक्तव्य केले हाेते. त्यांच्या वक्तव्याला युवा सेना सचिव म्हात्रे यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

स्थानिक भूमिपुत्र आणि नागरिक मुख्यमंत्री आणि खासदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कार्यकर्ते पोस्टर बॅनर मनापासून लावत असतात. कोणी त्यांना सांगत नाही. तीन तीन वेळा पक्ष नेतृत्वाला कल्याण लोकसभेमध्ये स्वतः यावे लागते. ते त्यांची जागा शोधण्याचा प्रयत्न करीत असले तरी त्यांना कार्यकर्ते शोधून सुद्धा सापडणार नाहीत असेही म्हात्रे यांनी सांगितले.

Web Title: "There will be no people left to give coffee, sandwiches to people of Ubhata group", criticizes Aditya Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.