हे तीन मोठे प्रकल्प कल्याण, डोंबिवली, अंबरनाथआणि उल्हासनगरचा प्रवास करणार वेगवान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 09:27 PM2021-09-21T21:27:55+5:302021-09-21T21:28:37+5:30
Kalyan-Dombivali News: कल्याण लोकसभा मतदार संघात एमएमआरडीएच्या माध्यमातून रस्ते विकासाचे तीन मोठे प्रकल्प सुरु आहे.
कल्याण - कल्याण लोकसभा मतदार संघात एमएमआरडीएच्या माध्यमातून रस्ते विकासाचे तीन मोठे प्रकल्प सुरु आहे. या प्रकल्पातील अडचणी दूर करण्यात आल्या असून हा प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना आज एमएमआरडीए आयुक्तांसोबत पार पडलेल्या बैठकीत नगरविकास आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्या आहे. या प्रकल्पांमुळे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि उल्हासनगरचा प्रवास गतीमान होणार असल्याचा दावा खासदार शिंदे यांनी केला आहे.
एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवासन यांच्यासोबत याविषयीची बैठक आज पार पडली. यावेळी कल्याण फाटा येथील कल्याण फाटा ते महापे हा उड्डाणपूल तीन लेनचा न करता चार लेनचा करण्यात यावा अशी सूचना खासदार शिंदे यांनी केली आहे. ऐरोली काटई मार्गातल्या दुस:या बोगद्याचे काम वेगाने सुरु आहे. ऐरोली बाजूस असलेल्या मार्गात विजेचा ट्रान्समिशन टॉवर आहे. त्यामुळे कामात अडसर ठरतो. हा टॉवर ़अन्य जागी हलविण्यासाठी वन विभागाने मंजूरी दिली आहे. त्यासाठी वन विभाग पर्यायी जागा उपलब्ध करुन देणार आहे.
एलिव्हेटेड प्रकल्पामुळे नवीमुंबई आण िकल्याण-डोंबिवली हि शहरे एकमेकांना जोडली जाणार आहेत. ह्या नवीन मार्गामुळे शिळफाटा येथील वाहतूक कोंडी टळणार असून ऐरोली ते काटई हे अंतर अवघ्या १५ मिनिटात पार करणो शक्य होणार आहे. ऐरोली ते मुंब्रा जंक्शनपर्यंतचा टप्पा पुढील वर्षात वापरासाठी खुला होईल असे खासदार शिंदे यांनी सांगितले.
कल्याण फाटा व शिळफाटा येथे अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडीपासून सुटका व्हावी ह्यासाठी कल्याण शिळफाटा येथे उड्डाणपूल व कल्याणफाटा येथे अंडरपास आणि ओव्हरिब्रजचे काम ऑक्टोबर मिहन्याच्या दुसऱ््या आठवड्यापासून सुरु करण्यात येईल. कल्याण फाटा येथे ग्रेड सप्रेशन ह्या प्रणाली द्वारे मुंब्रा बायपास येथून येणारी वाहतूक अंडरपासद्वारे तळोजा-पनवेल मार्गाकडे जाण्यास मदत होईल व डोंबिवली-नवीमुंबई वाहतुकीसाठी कल्याणफाटा येथेच उड्डाणपुलाच्या उभारणी करण्यात येणार आहे. कल्याणफाटा येथील उड्डाणपुलासाठी शिळफाटा-महापे मार्गातल्या एमआयडीसीच्या पाईपलाईन पर्यायी जागी स्थलांतरित करणो गरजेचे होते परंतु पाईपलाईन स्थलांतरित करणो अतिशय खर्चिक असल्या कारणाने कल्याण फाटा येथील उड्डाणपुलाचे अलाईंगमेंट बदलण्यात येणार आहे व हा उड्डाणपूल महापे येथील एमआयडीसीची पाईपलाईन ओलांडून महापे-शिळफाटा मार्गावरच उतरवण्यात येईल. सुमारे 90 कोटीचा हा उड्डाण पूल फक्त ३ लेनचा न करता तो ४ लेन करावा अश्या सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ह्यांनी अधिकार्यांना दिल्या. चौथ्या लेन साठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यास एम.एम. आर. डी. ए. च्या आयुक्तांनी संमती दर्शवली आहे. चौथ्या लेन उड्डाणपुलाच्या कल्याणफाटा येथील वाढीव जमीन अधिग्रहणाबाबत ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबत लवकरच एक बैठक घेण्यात येईल असे खासदार शिंदे ह्यांनी बैठकीत सांगितले.पत्रीपूलआणि दुर्गाडी किल्ल्याजवळील खाडी पुलाच्या उभारणीनंतर निळजे येथील उड्डाणपुलाचे कामसुद्धा प्रगतीपथावर आहे.