मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात बोलणाऱ्यांचे वाटोळे होईल : उदय सामंत
By अनिकेत घमंडी | Published: May 11, 2024 11:13 PM2024-05-11T23:13:43+5:302024-05-11T23:14:04+5:30
असंघटित कामगार संघटनेच्या वर्धापन दिन सोहळा
डोंबिवली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अहोरात्र झटत असून त्यांच्यावर खोटेनाटे आरोप करनाऱ्यांचे वाटोळे होईल असे उद्गार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी डोंबिवलीत काढले. असंघटित कामगार संघटनेच्या ११व्या वर्धापनदिनाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते पूढे म्हणाले की, कोकणात किरण सामंत यांची नाराजी नाही, आमदार राजन साळवी यांनी आधी स्वतःची आमदारकी वाचवावी, पूढे ते कुठं असतील याचा विचार करावा असेही सूचक वक्त्यव्य सामंत यांनी केले.
संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ यांच्याबद्दल सामंत यांनी गौरवोद्गार काढले, असा कामगारांसाठी झटणारा नेता राज्यात नाही, त्यांचे काम आणखी पुढे होत रहावे, आम्ही सगळे आणि मुख्यमंत्री शिंदे, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासमवेत आहेत त्यांनी काहीच काळजी करू नये असेही सामंत म्हणाले. त्यावेळी शिंदे सेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शहरप्रमुख राजेश मोरे, भाजपचे वाहतूक सेल अद्यक्ष दत्ता मालेकर आदी उपस्थित होते.
२० मे रोजी महायुतीचे उमेदवार डॉ. शिंदे यांना मत द्या आणि पुढील वर्षी कामगार भवन संस्थेला घेऊन जा असेही सामंत म्हणाले. निवडणूक आचार संहिता असल्याने जास्त काही बोलत नाही परंतु आपलं काम बोलत असेही ते म्हणाले.