सनातन धर्म संपविण्याची भाषा करणारे स्वतः संपतील: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
By मुरलीधर भवार | Published: September 22, 2023 05:57 PM2023-09-22T17:57:03+5:302023-09-22T17:58:56+5:30
अटल बिहारी वाजपेयी ह्यांनी चांद्रयान मोहिमेचा पाया रचला, भारत देश पुन्हा विश्वात अग्रेसर होत आहे.
मुरलीधर भवार, कल्याण-काल संसदेत भारताच्या चांद्रयान ३ मोहिमेला मिळालेल्या यशा बद्दल चर्चा सुरु होती, महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा आनंद जोरात सुरु आहे, ठाण्याच्या घरी दीड दिवसांचा गणपती, मुख्यमंत्री शासकीय निवासस्थानी गणपती,आपला दोन वर्षांचा मुलगा घरच्या दीड दिवसाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत आपल्या मुख्यमंत्री आजोबाच्या कडेवरून मोबाईल व्हिडीओ कॉल वरून आपल्या दिल्लीत संसदेच्या विशेष अधिवेशनात उपस्थित असलेल्या बाबांसोबत बोलत आहे,केवढा आनंदाचा क्षण ते कुटुंब मिस करत असतील, विचार करा एखाद्याने दिल्लीत संसदेत जाण्यापेक्षा हा आनंद आपल्या कुटुंबासोबत घेतला असता, पण नेहमीच आपल्या कर्तव्याची जान असलेलेकर्तव्याला महत्व देणारी ही शिंदे पिता पुत्रांची शिकवण, अश्या आपल्या लाडक्या आणि कर्तव्यदक्ष खासदार डॉ श्रीकांत शिंदे ह्यांनी भारताच्या चांद्रयान ३ ह्या अलौकिक व अभिमानास्पद अश्या मोहिमे बाबत बोलताना प्राचीन भारताचा गौरवशाली इतिहास आणि त्याला मिळालेली विज्ञानाची जोड ह्यांचे उदाहरणांसह भाष्य करताना आपल्या हिंदु धर्म संस्कृती, सनातन धर्म ह्याचे जोरदार पणे समर्थन केले आहे.
आपल्या देशाला गरीब, जादूगार आणि गारुड्यांचा देश म्हणून हिणवले गेले परंतु चांद्रयान ३ च्या यशानंतर हा देश शास्त्रज्ञांचा आणि विज्ञानात प्रगत देश म्हणून नावारुपाला आला, विज्ञान आणि आमची संस्कृती आमचा धर्म हे पूर्वापार एकत्र नांदतात, आमच्या धर्मात विज्ञान, आमच्या सणांमध्ये विज्ञान, आमच्या शास्त्र, आमची मंदिरे आणि आमच्या प्राचीन इमारती मध्ये विज्ञान दिसून येते, आमच्या गोस्वामी तुलसीदासांनी हनुमान चालीसा मधून पृथ्वी आणि सूर्या मधील अंतर सांगितले होते.
भारत हा ह्या अगोदरच विश्वगुरू म्हणून नावारूपाला आला असता पण मोगल आणि इंग्रजांनी आमच्यावर आक्रमण केले,लुटले, इतिहास साक्षी आहे जगातील विद्वान आमच्या नालंदा, तक्षशीला आणि विक्रमशीला हया प्राचीन महा विश्वविद्यालयात शिक्षण घेत, म्हणूनच आमच्यावर जे हल्ले झाले ते आमच्या ह्या विद्येच्या, ज्ञानांच्या भंडारांवर, आमच्या सांस्कृतिक नगरींवर, सध्याचे विरोधक दिल्लीच्या ज्या जंतरमंतर परिसरात येऊन विरोध करतात ते ऐतिहासिक जंतरमंतर सुधा भारतीय आकाशशास्त्र किती प्राचीन आहे हेच सांगते.
अटल बिहारी वाजपेयी ह्यांनी चांद्रयान मोहिमेचा पाया रचला, भारत देश पुन्हा विश्वात अग्रेसर होत आहे, २०१९ ला भारताच्या चांद्रयान २ ला थोडक्यात अपयश आले, पण पंतप्रधान मोदीजींनी आपल्या इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना धीर दिला आणि चांद्रयान ३ साठी तयारी करायला सांगितले, आत्ता सुधा काही विरोधक सनातन धर्माचे उच्चाटन करा, नष्ट करा अश्या वल्गणा करत सुटले आहेत, सनातन म्हणजे ज्याला अंत नाही आणि म्हणून त्या सर्व हिंदु द्वेष्टयांना येवढेच सांगतो जो सनातन धर्म संपवायची भाषा करतो तो स्वतः नष्ट होईल, जाता जाता चांद्रयान २ च्या अपयशातून ज्या वैज्ञानिकांमुळे भारताला चांद्रयान ३ मोहिमेत यश प्राप्त झाले त्यांच्यासाठी चार ओळी
जितुंगा, मैने खुदसे ये वादा किया…
जीतना सोचा था, कोशीश उस से जादा किया,
ताकदिर भी टुटी, पर हिम्मत न टुटी…
मजबूत इतना इस्त्रो ने इरादा किया…