"आमच्या लोकांमध्ये मतभेद असले तरी मनभेदांमध्ये त्यांचे परिवर्तन होणार नाही"
By मुरलीधर भवार | Published: November 11, 2023 09:40 PM2023-11-11T21:40:19+5:302023-11-11T21:41:01+5:30
केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांची प्रतिक्रिया
कल्याण- भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी काल अप्रत्यक्षरीत्या शिवसेना शिंदे गटावर नाराजी व्यक्त केली होती. याबाबत बोलताना केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांनी आमदार गणपत गायकवाड आणि महापालिका आयुक्त दोघांशी बोलणार आहेत. आम्ही सरकारमध्ये एकत्र आहोत ,समन्वय असणे एक गरजेचा आहे. काही वैयक्तिक वाद असेल तर ते बाजूला ठेवावेत. आमच्या लोकांमध्ये मतभेद असले तरी मनभेदांमध्ये त्यांचं परिवर्तन होणार नाही. ते पुन्हा एकत्र जोमाने कामाने लागतील, असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला आहे.
ठाणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान झाले आहे. याबाबत केंद्रीय मंत्री पाटील यांनी अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मी स्वतः सुद्धा शेतकरी आहे. माझ्या देखील पिकाचे नुकसान झाले आहे. सरकार संवेदनशील आहे. मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्या अशी मागणी केली आहे.
काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी बिहारमध्ये विधानसभेत ७५ टक्के आरक्षण मंजूर केले जाते. तर ते महाराष्ट्रात का होऊ शकत नाही असा सवाल केला होता . याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली . केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी सांगितले की, आपण जेव्हा ५० ट्क्केच्या वर आरक्षण देतो तेव्हा त्या आरक्षण संविधानाला धरून दिले. पाहिजे ज्या समाजाला तुम्ही आरक्षण देता. तो समाज मागास आहे सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारची असते, देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिले त्यावेळेस दिले आणि टिकवले. मात्र दुर्दैवाने अशोक चव्हाण ज्या सरकारमध्ये होते त्या सरकारला ते टिकवता आलं नाही. आता बिहार सरकारने केले. त्यांनी काय कारणे दिलेत, कुठल्या समाजाला दिले आणि ते समाज मागास आहेत का? हे अजून ठरवायचे आहे.
भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांच्या वतीने मतदारसंघातील पन्नास हजार कुटुंबांना मोफत शिधावाटप करण्यात आले. यानंतर मंत्री पाटील यांनी मी जेव्हा खासदार म्हणून निवडून आलो तेव्हा मला जितका आनंद झाला नाही , तितका आनंद या कुटुंबांसोबत दिवाळी साजरा करताना झाला अशी प्रतिक्रिया दिली आहे.