तीन भावंडे शाळेत गेली; मात्र सापडली खडवली नदीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 07:26 AM2023-10-20T07:26:12+5:302023-10-20T07:26:21+5:30

पोलिसांच्या अथक प्रयत्नाअंती मुलांची घरवापसी

Three siblings went to school; But it was found on Khadvali river | तीन भावंडे शाळेत गेली; मात्र सापडली खडवली नदीवर

तीन भावंडे शाळेत गेली; मात्र सापडली खडवली नदीवर

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : एका कुटुंबातील तीन भावंडे शाळेत गेली होती. मात्र, ती शाळेजवळून अचानक बेपत्ता झाली. त्या मुलांचा शोध लागत नसल्याने हवालदिल झालेल्या मुलांच्या वडिलांनी महात्मा फुले पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या साहाय्याने तीनही मुलांचा शोध लावला आहे. मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे. ही मुले खडवली नदीवर अंघोळीसाठी गेली होती. मात्र, पोलिस वेळीच त्याठिकाणी पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. 

कल्याण पश्चिमेच्या रामबागेत एक कुटुंबिय राहते. या कुटुंबातील एक मुलगी आणि दोन मुले ही जोशीबागेतील एका शाळेत शिकतात. सकाळी ही तिन्ही मुले शाळेत गेली हेाती. या तिन्ही मुलांना शाळेच्या गेटवर शिक्षकांनी पाहिले होते. मात्र, ही मुले घरी न आल्याने कुटुंबिय चिंताग्रस्त झाले. त्या मुलांच्या वडिलासह इतरांनी शोध सुरू केला. 

मुलींचा काही पत्ता लागत नसल्याने हवालदिल झालेल्या मुलांच्या वडिलांनी महात्मा फुले पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून घेतली. तीन मुले हरविली असल्याने पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि सहायक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक होनमाने आणि पोलिस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या पथकाने मुलांचा तातडीने तपास सुरू केला. 

सीसीटीव्हीमुळे लागला शोध
मुले राहत असलेली वस्ती, शाळा या परिसरासह कल्याण स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासले. ही मुले कल्याण स्टेशनमधील सीसीटीव्हीत दिसून आली. ही मुले कल्याण स्टेशनहून आसनगावच्या दिशेने ट्रेनने गेल्याचे दिसून आले. ही मुले ट्रेनने खडवली स्थानकात गेली. त्या स्थानकातून त्यांनी खडवली नदी गाठली. ही मुले खडवली नदीवर अंघोळीकरिता केली होती. मुले नदीत अंघोळीला उतरण्याच्या बेतात होती. मात्र, वेळीच त्याठिकाणी पोलिस पोहचले. पोलिसांनी त्या मुलांना घेऊन कल्याण गाठले. मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे.

Web Title: Three siblings went to school; But it was found on Khadvali river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.