थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित, ग्राहकांकडून वीजचोरी, १०५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

By अनिकेत घमंडी | Published: May 9, 2023 07:03 PM2023-05-09T19:03:37+5:302023-05-09T19:03:59+5:30

 महावितरणच्या टिटवाळा उपविभागातील प्रकार

Titwala News Electricity supply interrupted due to arrears, electricity theft from consumers, cases filed against 105 people | थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित, ग्राहकांकडून वीजचोरी, १०५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित, ग्राहकांकडून वीजचोरी, १०५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

googlenewsNext

अनिकेत घमंडी, डोंबिवली: थकीत बिलापोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतर वीजचोरी करणाऱ्या टिटवाळा उपविभागातील १०५ जणांविरुद्ध मुरबाड पोलीस ठाण्यात नुकतेच वीजचोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. महावितरणच्या पथकाने टिटवाळा परिसरात धडक कारवाई करून ५४ लाख ५६ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणलेल्या ग्राहकांचा यात समावेश असल्याचे महावितरणने मंगळवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले.

महावितरणच्या पथकाने टिटवाळा, मांडा, बल्याणी, अष्टविनायक चाळ, श्रीदेवी चाळ भागात थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या वीज ग्राहकांची तपासणी केली. कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर व कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबवण्यात आली. त्या तपासणीत १०५ जणांकडून विजेचा चोरटा वापर सुरू असल्याचे आढळले.

संबंधिताना चोरीच्या विजेचे देयक व तडजोडीची रक्कम भरण्याबाबत नोटिस देण्यात आली. परंतू विहित मुदतीत रकमेचा भरणा न झाल्याने संबंधितांविरुद्ध मुरबाड पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पोलिस निरिक्षक प्रसाद पांढरे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. थकबाकीपोटी एकदा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकीत वीजबिलाचा भरणा व पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय संबंधित ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला जात नाही. तर अशा ग्राहकांनी परस्पर वीजजोडणी, शेजारी किंवा इतरांकडून वीज घेतल्याचे आढळल्यास संबंधित ग्राहक व त्यांना वीज पुरविणारा अशा दोघांविरुद्धही फौजदारी अथवा दंडात्मक कारवाई करण्यात येते. टिटवाळ्याचे उपकार्यकारी अभियंता गणेश पवार यांच्या नेतृत्वाखाली सहायक अभियंता निलेश महाजन व त्यांच्या टिमने ही कारवाई केली.

Web Title: Titwala News Electricity supply interrupted due to arrears, electricity theft from consumers, cases filed against 105 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.