माझ्या प्रवेशानंतर विषय संपला, कल्याण पश्चिमेतून उद्धव सेनेकडून साईनाथ तारे इच्छूक
By मुरलीधर भवार | Published: October 9, 2024 04:51 PM2024-10-09T16:51:59+5:302024-10-09T16:52:21+5:30
माझ्या प्रवेशामुळे विषय संपला असल्याचा दावा उद्धव सेनेकडून कल्याण पश्चिमेतून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या साईनाथ तारे यांनी केला आहे.
कल्याण-कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास महाविकास आघाडीकडून उमेदवार नाही. त्यामुळे महायुतीतून बरेच लोक इच्छूक होते. माझ्या प्रवेशामुळे विषय संपला असल्याचा दावा उद्धव सेनेकडून कल्याण पश्चिमेतून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या साईनाथ तारे यांनी केला आहे.
काही दिवसापूर्वी शिंदे सेनेला सोडचिठ्ठी देत तारे यांनी उद्धव सेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या प्रवेशाला उद्धव सेनेतून काही निष्ठावंतांनी विरोध केला होता. मात्र विरोध करणारे काही जण प्रवेशाच्या वेळी हजर होते. तारे यांनी कल्याण पश्चिमेतून निवडूक लढविणार असल्याचे जाहिर केले आहे. कल्याण पश्चिमेत शिंदे सेनेचे आमदार विश्वनाथ भोईर आहेत. लोकसभा निवडणूकीत कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघातून कपील पाटील यांना खासदार सुरेश म्हात्रे यांच्या विरोधात जास्त मते मिळाली होती. लोकसभा निवडणूकीपेक्षा विधानसभा निवडणूकीत गणिते वेगळी असतात. महाविकास आघाडीकडून कल्याण पश्चिम मतदार संघाची जागा कोणत्या पक्षाला जाते. याचा निर्णय अद्याप झालेला नाही. महाविकास आघाडीकडून का’ंग्रेस पक्षाच्या कांचन कुलकर्णी, राजाभाऊ पातकर, राकेश मुथा, शिवसेना ठाकरे गटाकडून शहर प्रमुख सचिन बासरे इच्छूक आहे. अशा परिस्थितीत कल्याण पश्चिमेतून उद्धव सेनेकडून तारे हे इच्छूक असल्याचे त्यांनी सांगितले. शिंदे सेनेचे स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर यानी मतदार संघात काही कामे केलेली नाहीत अशी टिकाही तारे यांनी केली आहे.
तारे यांच्या दाव्यानंतर महाविकास आघाडीच्या अन्य इच्छूकांची काय प्रतिक्रिया येते ? शिंदे गटाचे आमदार भोईर हे तारे यांनी केलेल्या टिकेला काय उत्तर देतात ? हे देखील महत्वाचे ठरणार आहे.