चोळे गावात जपली जात आहे परंपरा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 04:24 PM2020-11-16T16:24:54+5:302020-11-16T16:25:06+5:30
शहरीकरणाची प्रक्रिया होत असताना गावे ही शहरे झाली. मात्र काही गावांनी आजही त्यांचे गावपण सोडले नाही त्या ठिकाणी आजही जुन्या परंपरा जपल्या जात आहेत.
डोंबिवली - शहरीकरणाची प्रक्रिया होत असताना गावे ही शहरे झाली. मात्र काही गावांनी आजही त्यांचे गावपण सोडले नाही त्या ठिकाणी आजही जुन्या परंपरा जपल्या जात आहेत. डोंबिवली नजीक ठाकुर्ली येथे चोळे गाव आहे. या गावात आज बलिप्रतिपदा साजरी करण्यात येते. यावेळी बळीराजाची पूजन करण्यात आले. त्याचबरोबर आगरी समाज हा बलिप्रतिपदेच्या दिवशी त्यांच्या घरातील गुरे वासरे यांचे पूजन करतो. विशेष तः शेतीच्या कामासाठी उपयुक्त असलेल्या बैलाला खास सजवले जाते . कारण त्याच्यामुळे शेतीची कामे करणे सुलभ होते. त्याच्या कष्टाप्रति असलेला आदर आज व्यक्त केला जातो. चोळेगावातील जुने रहिवासी प्रभाकर चौधरी आणि त्यांच्या मित्रमंडळी आज बलिप्रतिपदा आणि बैल पोळा पोळा साजरा करू आपली परंपरा जपत त्यांच्या गाव पणाच्या कोणाही जपण्याचा प्रयत्न केला आहे.