कल्याण पूर्वेत दोन गँगचा राडा, पाच गाड्यांची तोडफोड

By मुरलीधर भवार | Published: June 6, 2024 05:11 PM2024-06-06T17:11:00+5:302024-06-06T17:11:23+5:30

कल्याण पूर्वेतील साईनगरात गुंडांच्या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. या राड्या दरम्यान रस्त्यावर उभ्या असलेल्या पाच गाड्यांची तोडफोड केली आहे.

Two gangs ransacked, vandalized five cars in Kalyan East | कल्याण पूर्वेत दोन गँगचा राडा, पाच गाड्यांची तोडफोड

कल्याण पूर्वेत दोन गँगचा राडा, पाच गाड्यांची तोडफोड

कल्याण-कल्याण पूर्वेत सराई गुन्हेगारांच्या दोन गटाच्या टोळक्यामध्ये जोरदार राडा झाला. राग काढण्यासाठी या टोळक्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या पाच गाड्यांची तोडफोड केली. परिसरात दहशत माजविण्यासाठी हा प्रकार केला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटना घडताच सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी घाव घेतली आहे. या प्रकरणात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात दोन्ही गँगचा दोन जणांना अटक केली आहे. तुषार वाल्मीकी आणि अरविंद नायडू अशी दोघांची नावे आहेत. अन्य आरोपींचा पोलिस शोध घेत आहे. कल्याण पूर्वेत नायडू गँग आणि दही गँग यांच्यात वर्चस्ववादाची लढाई आहे.

कल्याण पूर्वेतील साईनगरात गुंडांच्या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. या राडया दरम्यान रस्त्यावर उभ्या असलेल्या पाच गाड्यांची तोडफोड केली आहे. त्यामध्ये तीन चार चाकी, एक दुचाकी आणि एक रिक्षा यांचा समावेश आहे. घटना घडताच भाजप, शिंदे गट, ठाकरे गट या पक्षांचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मध्यरात्री परिसरात गोंधळाची परिस्थिती होती. परिसरातील सर्व सामान्य नागरीक गुंडांच्या गुंडगिरीमुळे भयभीत झाले आहेत. दरराेज हे गुंड नागरीकांना त्रास देतात. आपसालीतल भांडणामुळे नागरीकांचे नुकसान करतात. या प्रकरणात कोळसेवाडी पेलिसांनीया दोन्ही टोळीच्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे.

तुषार वाल्मीकी आणि अरविंद नायडू अशी या आरोपींची नावे आहेत या दाेघांच्या विरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. कल्याण पूर्वेत नायडू गँग आणि आणि दही गँग यांच्या वाद आहे. या दोन्ही टोळक्यामधील अनेक आरोपी आरोपी जेलमध्ये आहे. दोन्ही टोळक्यातील गट एकमेकांवर हल्ले करतो. कल्याण पूर्वेत दहशत माजविण्यात या दोघांचा हात आहे. दाेन दिवसापूर्वी एका रिक्षा चालकासही दमदाटी करुन तू दही गँगला ओळखत नाही का असे सांगत मारहाण केली होती.
 

Web Title: Two gangs ransacked, vandalized five cars in Kalyan East

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.