कल्याणमध्ये दोन सराईत चोरटे ताब्यात; १२ लाखाचे दागिने हस्तगत

By सचिन सागरे | Published: March 10, 2024 03:18 PM2024-03-10T15:18:44+5:302024-03-10T15:19:44+5:30

कोळशेवाडी पोलिसांची कामगिरी

Two inns seized by thieves; Jewels worth 12 lakhs seized, | कल्याणमध्ये दोन सराईत चोरटे ताब्यात; १२ लाखाचे दागिने हस्तगत

कल्याणमध्ये दोन सराईत चोरटे ताब्यात; १२ लाखाचे दागिने हस्तगत

कल्याण : कोळशेवाडी पोलिसांना घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना अटक करण्यात यश आले आहे. ताब्यात घेतलेल्या या दोघा चोरट्यांकडून पोलिसांनी तब्बल १२ लाखाचे दागिने हस्तगत केले आहेत.

कोळशेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या राजेश राजभर, राहुल घाडगे अशी दोन चोरट्यांची नावे आहेत. राजेश विरोधात बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, वसई, विरार, मुंबई, पुणे येथील पोलिस ठाण्यात ३० घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश नायदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनकर पगारे, पोलीस अधिकारी मदने, सुशील हांडे, सुरेश जाधव, सचिन कदम यांच्या पथकाने तपास सुरू केला. खबऱ्यांनी दिलेली माहिती व सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची ओळख पटवून या चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी सापळा रचला होता. 

विठ्ठलवाडी बस डेपोजवळ रचलेला सापळ्यात सराईत चोरटा राहुल घाडगे याला पकडण्यात पोलिसांना यश आले. राहुल घाडगे विरोधात कोळशेवाडी पोलीस ठाण्यातच तब्बल पाच घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून पोलिसांनी दोन लाख दहा हजारांचे सोन्याचे दागिने जप्त केले. याच दरम्यान कोळशेवाडी पोलिसांना घरफोडी करण्यात सराईत असलेला राजेश राजभर हा उत्तर प्रदेश येथे आपल्या गावी लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी उत्तर प्रदेश आजमगड येथील लालगंज परिसरात वेशांतर करून सापळा रचला व त्या ठिकाणाहून राजेश राजभर याला बेड्या ठोकल्या. 
कोळशेवाडी पोलिसांनी आतापर्यंत त्याच्याकडून चार गुन्ह्यांची उकल करत दहा लाखांचे दागिने हस्तगत केले. चोरी केलेले दागिने राजेश त्याच्या परिवारातील त्याचे वडील, भाऊ व वहिनी यांच्या मार्फत सोनारांना विक्री करत होता व आलेल्या पैशातून त्याचे कुटुंब उपजीविका करत होते.

Web Title: Two inns seized by thieves; Jewels worth 12 lakhs seized,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.