कल्याण दुर्गाडी खाडी पूलाच्या दोन लेन जूनच्या पहिल्या आठवडय़ात खुल्या होणार, आयुक्तांनी केली पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 07:12 PM2021-05-05T19:12:17+5:302021-05-05T19:12:33+5:30
KDMC News : सहा पदरी दुर्गाडी खाडी पूलाच्या दोन लेनचे काम अंतिम टप्प्यात असताना कल्याण डोंबिवली महापालिका महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज पाहणी केली.
कल्याण - कल्याण दुर्गाडी खाडी पूलाच्या सहा लेन पैकी दोन लेन येत्या जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात वाहतूकीसाठी खुल्या करण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न ब:यापैकी मार्गी लागणार आहे. दोन लेनचे काम अंतिम टप्प्यात आहे.
सहा पदरी दुर्गाडी खाडी पूलाच्या दोन लेनचे काम अंतिम टप्प्यात असताना कल्याण डोंबिवली महापालिका महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज पाहणी केली. यावेळी एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता जयवंत ढाणे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक पवार, नगररचनाकार रघुवीर शेळके आदी उपस्थित होते. कल्याण भिवंडी मार्गावरील दुर्गाडी खाडी पूल हा दोन लेनचा होता. युती सरकारच्या काळात त्याचे बांधकाम करण्यात आले होते. सध्या अस्तित्वात असलेला पूल हा वाहतूकीसाठी अपुरा पडत होता. याच पुलाला समांतर सहा पदरी दुर्गाडी खाडी पूलाला २०१६ मध्ये मंजूरी दिली गेली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूलाचे भूमीपूजन करण्यात आले. पूलाच्या कामासाठी नेमलेल्या कंत्रटदाराकडून दिरंगाई होत असल्याने त्याला दिलेले कंत्रट दोन वर्षानंतर रद्द करण्यात आले. १०१ कोटी रुपये खर्चाचे सहा पदरी पूलाचे काम तांदळकर आणि थोरात कंपनीला देण्यात आले. या कंपनीने रायगड येथील सावित्री पूल तयार केला होता. त्या कंपनीने पूलाचे काम युद्धपातळीवर उचलले. मात्र २०१९ मध्ये अतिवृष्टीचा बसलेला फटका आणि त्यानंतर कोरोना लॉकडाऊनमुळे पूलाच्या कामाची गती मंदावली होती. पूलाच्या सहा लेनपैकी दोन लेन जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात खुल्या झाल्यावर जुना अस्तित्वात असलेला दोन लेनचा पूल आणि नव्याने उभारण्यात आलेल्या पूलाच्या दोन लेन खुल्या झाल्यावर वाहतूकीसाठी चार लेन उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर उर्वरीत चार लेनही भविष्यात खुल्या केल्या जातील. भिवंडी-कल्याण-शीळ रोडवरील दुर्गाडी खाडी पूल हा महत्वाचा पूल आहे. गतवर्षी डिसेंबर महिन्यात कल्याण पत्री पूल मार्गी लागला. त्या पाठोपाठ दुर्गाडीच्या दोन लेन खुल्या होत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणार आहे.
कल्याण रिंग रोडच्या कामासाठी मागितले पोलिस संरक्षण
दुर्गाडी खाडी पूलाच्या कामाची पाहणी केल्यावर महापालिका आयुक्तांनी कल्याण रिंग रोडच्या दुर्गाडी ते मांडा टिटवाळा दरम्यानची पाहणी केली. रिंगरोडचे या टप्प्यातील ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र काही ठिकाणी अडथळे आहेत. रिंग रोडचे काम ज्या ठिकाणी पूर्णत्वास आले आहे त्याचा वापर सुरु झाला आहे. झालेले काम जून महिन्यार्पयत महापालिकेस हस्तांतरीत केले जाईल. ज्याठिकाणी कामला विरोध आहे. त्यासाठी पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी एमएमआरडीएच्या वतीने रेलकॉन कंत्रटदार कंपनीने पोलिस व महापालिका प्रशासनाकडे केली आहे.