क्लिनअप मार्शल असल्याचे सांगत नागरिकांना लुबडणारे दोन जण अटकेत

By मुरलीधर भवार | Published: January 12, 2024 05:16 PM2024-01-12T17:16:03+5:302024-01-12T17:16:11+5:30

कल्याण महात्मा फुले पोलिसांची कारवाई

Two people arrested for robbing citizens claiming to be cleanup marshals | क्लिनअप मार्शल असल्याचे सांगत नागरिकांना लुबडणारे दोन जण अटकेत

क्लिनअप मार्शल असल्याचे सांगत नागरिकांना लुबडणारे दोन जण अटकेत

कल्याण- क्लीनअप मार्शल असल्याचे सांगत रस्त्यावर थुंकणाऱ्या डिजिटल वॉचच्या सप्लायरला लुटणाऱ्या दोन भामट्यांना कल्याण महात्मा फुले पोलिसा ठाण्याच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संकेत उतकेर आणि अमित कुळे अशी या दोन जणांची नावे आहेत. त्यांनी अशा प्रकारे आणखी काही नागरिकांना लुटल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

कल्याण वालधुनी परिसरात विल्सन दोरास्वामी हे डिजिटल वॉचच्या सप्लायर पायी चालत असताना दुचाकीवर आलेल्या दोन इसमानी त्यांना अडविले . या दोघांनी आम्ही महापालिकेचे क्लीन अप मार्शल असून तुम्ही रस्त्यावर थुंकला आहात. तुम्हाला दंड भरावा लागेल असे सांगितले. काही क्षणातच या दोघांनी दोरास्वामी यांची डिजिटल वॉच आणि रोकड असलेली बॅग हिसकावली. बॅग घेऊन त्यांनी आमचे साहेब समोर उभे आहेत त्यांना भेटून घ्या असे सांगत या दोन्ही त्या ठिकाणाहून धूम ठोकली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या प्रकरणी दोरास्वामी यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली .महात्मा फुले पोलिसांनी तांत्रिक तपास करत संकेत उतकेर आणि अमित कुळे या दोघांना अटक केली आहे.

Web Title: Two people arrested for robbing citizens claiming to be cleanup marshals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.