"उद्धव ठाकरे यांनी आम्हाला मदत करुन दिली नाही, म्हणून एकनाथ शिंदे आमच्यासोबत", भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे विधान
By मुरलीधर भवार | Published: September 14, 2022 04:22 PM2022-09-14T16:22:45+5:302022-09-14T16:23:26+5:30
Ganpat Gaikwad: राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना एकनाथ शिंदे यांची आम्हाला मदत करण्याची इच्छा होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी आम्हाला मदत करु दिली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले असे विधान कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी यांनी केले आहे.
- मुरलीधर भवार
कल्याण - राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना एकनाथ शिंदे यांची आम्हाला मदत करण्याची इच्छा होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी आम्हाला मदत करु दिली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले असे विधान कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी यांनी केले आहे.
एका सोशल मिडियावर काही सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकत्र्यानी आमदार गायकवाड यांच्या कामाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावेळी आमदार गायकवाड यांनी सोशल मिडियावर चर्चा करण्यापेक्षा खुली चर्चा करा. समोर येऊन कोणत्याही प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी समर्थ आहे असे आव्हान दिले होते. त्यानुसार आज ड प्रभाग कार्यालयाच्या समोर समाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विनोद तिवारी यांच्यासह काही नागरीक यांच्याशी चर्चा करण्यासाठी आमदार गायकवाड आले होते. यावेळी चर्चेच्या दरम्यान आमदार गायकवाड यांनी उपरोक्त विधान केले.
आमदार गायकवाड यांनी सांगितले की, राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आहे. या दोन्ही नेत्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मी मिळून फूल स्पीडने कल्याण पूर्व मतदार संघाचा विकास करुन अशी हमी उपस्थित जागरुक नागरीक वर्गाला दिली. शहरातील विकास कामांसंदर्भात तिवारी यांच्यासह अन्य नागरीकांनी पंधरा मुद्यावर आमदार गायकवाड यांनी चर्चा केली. त्यांनी नागरीकांच्या सगळ्य़ा प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली. एखाद्या विकास कामासाठी किती निधी प्राप्त झाला. एखादे काम झाले आहे. तर एखादे काम का झाले नाही. ते न होण्यामागचे तांत्रिक आणि प्रशासकीय अडथळे काय आहेत. त्याची सविस्तर माहिती दिली.
कोणती कामे नगरसेवकांशी संबंधित आहे. कोणती कामे खासदार आणि आमदारांशी संबंधित आहेत या विषयीची माहिती उपस्थितांना दिली. तसेच नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी मी २४ तास उपलब्ध असतो. नागरीक माङयाकडे अनेक प्रश्न घेऊन येत असतात. त्याउपरही मी दर रविवारी नागरीकांच्या भेटी गाठीसाठी वेळ राखून ठेवतो. प्रत्येक नागरीकांना कार्यालयात भेटून त्यांची समस्या जाणून घेतो. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करतो. तसेच त्यांचा आढावा घेऊन समस्या सोडविल्यावर त्या नागरीकाला फोन करुन सांगतो की, त्याचे काम झाले आहे किंवा किती दिवसात मार्गी लागणार आहे. त्यामुळे काही प्रश्न सुटले नसतील तर ते का सुटले नाही. त्याची कारणो काय आहे. हे जाणून घेऊन आरोप केले पाहिजे. थेट कोणावर काही आरोप करणे योग्य नाही. लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचा अधिकार नागरीकांना आहे. तो त्यांनी विचारलाच पाहिजे याकडे आमदार गायकवाड यांनी यावेळी लक्ष वेधले.