अरे पुन्हा शिवसेनेच्या पेटल्या मशाली; कल्याणमधील ठाकरे गटाने हातात मशाली घेऊन साजरा केला आनंद  

By मुरलीधर भवार | Published: October 11, 2022 12:41 AM2022-10-11T00:41:46+5:302022-10-11T00:41:52+5:30

यावेळी कल्याण महानगर प्रमुख विजय साळवी यांच्यासह अरविंद मोरे,  दत्तात्रय खंडागळे आणि विद्याधर भोईर हे पदाधिकारी देखील कार्यकर्त्यांसह उपस्थित होते.

Uddhav Thackeray-led Shiv Sena gets new election symbol The Thackeray group in Kalyan celebrated with torches | अरे पुन्हा शिवसेनेच्या पेटल्या मशाली; कल्याणमधील ठाकरे गटाने हातात मशाली घेऊन साजरा केला आनंद  

अरे पुन्हा शिवसेनेच्या पेटल्या मशाली; कल्याणमधील ठाकरे गटाने हातात मशाली घेऊन साजरा केला आनंद  

Next

कल्याण: उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून धनुष्यबाण या शिवसेनेच्या चिन्हावर दावा करण्यात आला होता मात्र निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर दोन्ही गटाला चिन्हांचे पर्याय देण्यात आले होते त्यानुसार ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने मशाल चिन्ह दिले आहे. शिवसेनेला मशाल हे चिन्ह मिळतात आज कल्याणमधील ठाकरे गटाने हातात मशाली घेऊन आनंद साजरा केला या मशाली घेत त्यांनी थेट कल्याण पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आपल्या भावना व्यक्त केल्या. 

यावेळी कल्याण महानगर प्रमुख विजय साळवी यांच्यासह अरविंद मोरे,  दत्तात्रय खंडागळे आणि विद्याधर भोईर हे पदाधिकारी देखील कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद उद्धव ठाकरे जिंदाबाद धर्मवीर आनंद दिघे जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद उद्धव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है या घोषणांनी शिवाजी चौक दणाणून सोडला. ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळतात समाज माध्यमांवर याविषयी जोरदार स्वागत कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. 


विशेष करून मराठीतील राजकारणावर गाजलेल्या सिंहासन चित्रपटातील सुरेश भट लिखित अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली हे गीत अनेकांनी फेसबुक वर उद्धव ठाकरे यांच्या संग्रहित फुटेज टाकून एक प्रकारे आनंदच व्यक्त केला.

Web Title: Uddhav Thackeray-led Shiv Sena gets new election symbol The Thackeray group in Kalyan celebrated with torches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.