डोंबिवलीत मोदी सरकारचा उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून निषेध, घोषणाबाजी

By अनिकेत घमंडी | Published: July 18, 2024 02:44 PM2024-07-18T14:44:18+5:302024-07-18T14:44:31+5:30

केंद्र सरकारच्या धोरणाचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज डोंबिवलीत जाहीर निषेध करण्यात आला.

Uddhav Thackerays Shiv Sainiks protest against Modi government in Dombivli, chant slogans | डोंबिवलीत मोदी सरकारचा उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून निषेध, घोषणाबाजी

डोंबिवलीत मोदी सरकारचा उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून निषेध, घोषणाबाजी

अनिकेत घमंडी/ डोंबिवली: काश्मीरमध्ये होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यात अनेक भारतीय जवान शहीद झाले असून काहीजण जखमी झाले असल्याने गुरुवारी सकाळी डोंबिवली पूर्वेतील इंदिरा गांधी चौकात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने गुरुवारी तीव्र निदर्शने करून केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा जाहीर निषेध केला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकारचा निषेध असो अशी घोषणाबाजी करत शिवसेना पक्षाने निषेध व्यक्त केला.

२०१४पासून मोदी सरकारच्या काळात कित्येक वेळा भारतावर आतंकवादी हल्ले झाले आहेत. त्यांच्या चुकीच्या धोरणाचा फटका भारत सीमेवर आपल्या जीवाची बाजी लावून देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना सोसावे आणि भोगावे लागत आहे. केंद्र सरकारच्या या चुकीच्या धोरणाचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज डोंबिवलीत जाहीर निषेध करण्यात आला. कारण मागील 38 दिवसांमध्ये भारतावर दहशतवाद्यांकडून नऊ ते दहा हल्ले करण्यात आले. यामध्ये भारताचे १२जवान शहीद झाले तर १३ जण जखमी झाले आहेत. तसेच १० सर्वसामान्य नागरिकांचा बळी गेला तर ४४ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे देश रक्षणाची जबाबदारी घेणाऱ्या फेकू प्रधानमंत्री म्हणून विराजमान असलेल्या नरेंद्र मोदी सरकारचा डोंबिवली शिवसेना शहर शाखेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. त्यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, उपजिल्हाप्रमुख तात्या माने, विधानसभा संघटक सुरेश परदेशी, माजी नगरसेवक सुधाकर वायकोळे, डोंबिवली शहर प्रमुख अभिजीत सावंत, उपशहर प्रमुख अभिजीत थरवळ युवा शहराधिकारी प्रसाद टूकरूळ यांच्या नेतृत्वाखाली सतीश मोडक राहुल भगत, अभिजीत सोळकर ,सुदर्शन जोशी ,आणि यश सोनी यासह शिवसैनिक यांनी या आंदोलनात सहभागी झाले होते. 

Web Title: Uddhav Thackerays Shiv Sainiks protest against Modi government in Dombivli, chant slogans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.