लवकरच ठाणे, कल्याण रेल्वे स्थानकांवर अत्याधुनिक नर्सिंग पॉड्स

By अनिकेत घमंडी | Published: June 16, 2023 05:40 PM2023-06-16T17:40:25+5:302023-06-16T17:41:15+5:30

याआधी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनर्स येथे एक नर्सिंग पॉड स्थापित करण्यात आला आहे, तर दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनर्स येथे प्रत्येकी तीन स्थापित केले आहेत.

ultramodern nursing pods at Thane, Kalyan railway stations soon | लवकरच ठाणे, कल्याण रेल्वे स्थानकांवर अत्याधुनिक नर्सिंग पॉड्स

लवकरच ठाणे, कल्याण रेल्वे स्थानकांवर अत्याधुनिक नर्सिंग पॉड्स

googlenewsNext

 डोंबिवली: बाळांना स्तनपान करणा-या महिलांना आराम आणि आधार प्रदान करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण उपक्रमात, भारतीय रेल्वेच्या मुंबई विभागाने सात प्रमुख रेल्वे स्थानकांवर १३ अत्याधुनिक नर्सिंग पॉड्स बसवण्याची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत लवकरच ठाणे येथे दोन आणि कल्याण आणि पनवेलमध्ये प्रत्येकी एक तसेच लोणावळ्यात लवकरच दोन नर्सिंग पॉड असतील. याआधी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनर्स येथे एक नर्सिंग पॉड स्थापित करण्यात आला आहे, तर दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनर्स येथे प्रत्येकी तीन स्थापित केले आहेत.

उपनगरीय लोकल ट्रेनमध्ये बाळासह विशेषत: दररोजच्या गर्दीच्या वेळेस गोंधळाचा विचार करता प्रवास करणे हे निःसंशयपणे एक अतिशय कठीण काम आहे. मुंबई लोकलमधील प्रवाशांना याचा सामना करावा लागतो. स्तनपान करणाऱ्या मातांसाठी सुविधांचा अभाव त्यांच्यासमोरील आव्हाने वाढवतो. त्यामुळे, नर्सिंग पॉड्सची निर्मिती या प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान त्यांच्या अर्भकांना खायला आणि त्यांची काळजी घेण्यासाठी सुरक्षित आणि आरामदायी जागा उपलब्ध करून देणारी मोठी मदत होणार असल्याचा विश्वास रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केला. नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर फीडिंग अँड रेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर फॉर स्टेशन्स धोरणांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या या समर्पित जागा, प्रवास करताना मातांना त्यांच्या अर्भकांना स्तनपान देण्यासाठी सुरक्षित आणि आरामदायी क्षेत्र म्हणून काम करतील.

या धोरणात्मक वितरणाचे उद्दिष्ट संपूर्ण मुंबई विभागातील स्तनपान करणा-या महिलांच्या गरजा पूर्ण करणे असल्याचे सांगण्यात आले. प्रत्येक नर्सिंग पॉड माता आणि त्यांच्या बाळांना स्तनपानाचा अनुभव वाढविण्यासाठी डिझाइन केलेल्या अनेक सुविधा प्रदान करेल. आरामदायी उशी असलेली बसण्याची जागा, डायपर बदलण्यासाठी समर्पित स्टेशन, वायुवीजनासाठी पंखा, रोषणाईसाठी प्रकाश आणि वापरलेल्या डायपरच्या स्वच्छ विल्हेवाटीसाठी एक डस्टबिन असेल. या सुविधांची देखभाल परवानाधारक सेवा प्रदात्याकडून केली जाईल. या नर्सिंग पॉड्स आर्थिकदृष्ट्या टिकाऊ आहेत याची खात्री करण्यासाठी, प्रत्येक पॉडच्या बाजूने कराराच्या संपूर्ण कालावधीसाठी परवानाधारकांकडून जाहिराती प्रदर्शित केल्या जातील. या जाहिराती केवळ पॉड्सच्या देखरेखीसाठी महसूल मिळवण्यास मदत करतील असे नाही तर ते आकर्षक पद्धतीने देखील सादर केले जातील. 

Web Title: ultramodern nursing pods at Thane, Kalyan railway stations soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.