कल्याण आणि लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकांत एक अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 03:26 PM2020-11-19T15:26:54+5:302020-11-19T15:27:08+5:30

बॅगेज स्कॅनिंग आणि रॅपिंग सुविधा, मुंबई विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्रथम उपलब्ध झालेल्या या सुविधेस प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला 

A unique venture at Kalyan and Lokmanya Tilak Terminus stations | कल्याण आणि लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकांत एक अनोखा उपक्रम

कल्याण आणि लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकांत एक अनोखा उपक्रम

googlenewsNext

कल्याण - मध्य रेल्वेने पुणे विभागातील 'कॅप्टन अर्जुन', नागपूर विभागातील स्वयंचलित तिकिट तपासणी व प्रवेश व्यवस्थापन (एटीएमए) या सारख्या कोविड १९ च्या दृष्टीने प्रवाशांच्या आणि रेल्वे कर्मचार्‍यांच्या सुरक्षेचा विचार करून फेब्रीआय थर्मल बॉडी स्क्रीनिंग आणि  मुंबई विभागातील वैद्यकीय सहाय्यक  'जीवक' आणि 'रक्षक', सोलापूर विभागात वैद्यकीय सहाय्यक (रो) बॉट आवृत्ती १ आणि २ असे अनेक अभिनव उपाय केले आहेत. 

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कल्याण आणि लोकमान्य टिळक टर्मिनस  स्थानकात  एनआयएनएफआरआयएस धोरणांतर्गत नुकताच एक अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला असून  प्रवाशांना त्यांच्या प्रवासात कोविड साथीचा आजार पाहता, सामानाची सफाई ( cleaning) आणि पॅकिंगच्या सुविधांमुळे  त्यांना संरक्षण देण्यात आले आहे.  यामध्ये अल्ट्रा व्हायोलेट (यूव्ही) किरणांद्वारे परवडणार्‍या दराने सॅनिटायझिंग  प्रदान केले जाते आणि बॅगेजच्या आकाराच्या आधारे, सॅनिटायझिंग शुल्क निश्चित केले जाते.

 मुंबई विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्रथम उपलब्ध झालेल्या या सुविधेस प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.  कल्याण व लोकमान्य टिळक टर्मिनस  स्थानकांनंतर दादर, ठाणे आणि पनवेल स्थानकांवरही ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Web Title: A unique venture at Kalyan and Lokmanya Tilak Terminus stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे