‘रिजन्सी ॲन्टिलिया’च्या क्लबहाउसचे अनावरण, क्लौडिया सिसेलाची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 12:23 AM2020-12-02T00:23:28+5:302020-12-02T00:24:01+5:30

योग, झुम्बा, अरोबिक्स आदी सुविधा

Unveiling of Regency Antilia's clubhouse, the presence of Claudia Cecilia | ‘रिजन्सी ॲन्टिलिया’च्या क्लबहाउसचे अनावरण, क्लौडिया सिसेलाची उपस्थिती

‘रिजन्सी ॲन्टिलिया’च्या क्लबहाउसचे अनावरण, क्लौडिया सिसेलाची उपस्थिती

Next

डोंबिवली : कोडनेम कल्याण नेक्स्ट येथील ॲन्टिलिया या रिजन्सी समूहाच्या वसाहतीतील क्लबहाउसचे अनावरण रविवारी एका दिमाखदार सोहळ्यात झाले. त्यावेळी प्रख्यात अभिनेत्री क्लाैडिया सिसेला यांची विशेष उपस्थिती सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरली.
कल्याण परिसरातील दर्जेदार ठरणाऱ्या या संकुलातील क्लबहाउसच्या उद्घाटनप्रसंगी उल्हासनगरच्या महापौर लीलाबाई आशान, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार कपिल पाटील, माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आमदार कुमार आयलानी, आमदार डॉ. बालाजी किणीकर, टीम ओमी कलानीचे प्रमुख उमेश कलानी हे मान्यवर अतिथी म्हणून या सोहळ्यास हजर होते. रिजन्सी समूहाचे सर्वेसर्वा महेश अगरवाल यांनी सगळ्यांचे स्वागत केले.

एक लाख ८० हजार चौरस फूट इतक्या विस्तीर्ण जागेत सहास्तरीय क्लबहाउस हे रिजन्सी ॲन्टिलियाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. संपूर्ण देशभरात हे क्लबहाउस एकमेवाद्वितीय असल्याचा दावा अगरवाल यांनी केला. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी इथे विविध प्रकारच्या सोयीसुविधा आहेत. त्यात खेळाची मैदाने, उद्याने, कारंजे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कक्ष, अद्ययावत व्याायामशाळा, झुम्बा-अ‍ॅरोबिक्स, योगसाधनेसाठी कक्ष, तरणतलाव आदी सुविधा असणार आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे धावपळीच्या जीवनात ताजेतवाने होण्यासाठी या क्लबहाउसमध्ये अनेक उत्तमोत्तम पर्याय उपलब्ध असणार आहेत. क्वॅश, क्रिकेट, बॅडमिंटन, गोल्फ आदी क्रीडाप्रकार येथे असणार आहेत. उल्हास नदीचा किनारा संकुलापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर आहे.
क्लबहाउसमध्ये उत्तम सभागृह, बँक्वेट हॉल असून रहिवाशांना इथे डीनरचा आनंद घेता येईल. क्लबहाउस अनावरणाबरोबरच मुंबईतील नामवंत सलोन आणि स्पा ‘झोरो’ची शाखाही इथे कार्यान्वित होत आहे. गुणवत्ता आणि सौंदर्याची जोड असलेल्या विविध संकुल प्रकल्पांमुळे रिजन्सी समूहाने वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.

खारघर, ठाणेसारख्या ठिकाणी विविध प्रकल्प  
पुणे, लोणावळा, ठाणे, खारघर, कल्याण, डोंबिवली येथील रिजन्सीचे प्रकल्प त्याची साक्ष देतात. रिजन्सीच्या याच वैशिष्ट्यांमुळे नामवंत ब्रॅण्ड संकुल परिसरात येतात. सध्या मुंबई महानगर क्षेत्रातील प्रमुख बांधकाम व्यावसायिकांमध्ये रिजन्सी समूहाचा समावेश होतो. गेल्या १९ वर्षांत २० हून अधिक प्रकल्प समूहाने साकारले. त्यात १७ हजार कुटुंबे समाधानाने राहतात.

Web Title: Unveiling of Regency Antilia's clubhouse, the presence of Claudia Cecilia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.