आरक्षणाबाबत सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहिलेले उत्तम - कपिल पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 03:23 PM2024-01-30T15:23:23+5:302024-01-30T15:24:58+5:30
पाटील यांनी सांगितले की, मराठा आरक्षणाच्या विषयात सरकार लक्ष घालून आहे.
कल्याण- कुणबीच्या नोंदी होणार असतील तर अस्थिरता होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वांनी संयमाने घ्यावे मुख्यमंत्री तसेच सर्व मंत्रिमंडळाने ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण देणार असे स्पष्ट केले. सरकारने योग्य भूमिका घेतली आहे. त्यामुळे कोणी अशा प्रकारचे वक्तव्य करू नये, सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहिलेले उत्तम अशी प्रतिक्रिया केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी दिली.
ओबीसींनी शांत बसावे मराठ्यांच्या आरक्षणावर हरकती घेऊ नये नाहीतर ओबीसींचे देशातले सगळेच २७ टक्के आरक्षण रद्द करण्यासाठी सुप्रिम कोर्टात जावे लागेल असा वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं. याबाबत केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली. मंत्री पाटील यांनी सांगितले की, मराठा आरक्षणाच्या विषयात सरकार लक्ष घालून आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण देणार असे मुख्यमंत्र्यांनी शाश्वत केले, अजित दादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याचा पुनरुच्चार केला. मात्र सहाजिकच कुणबी समाजाच्या नोंदी होणार असतील तर थोडीशी अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
या सगळ्या गोष्टी संयमाने घेतल्या पाहिजे. अशा प्रकारचे वक्तव्य हे टाळले पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत कोणाचाही विरोध नाही नव्हता आणि नसणार. मात्र दुसऱ्या समाजाचा आरक्षण आहे त्याला धक्का न लावता आरक्षण द्यावे. या भूमिकेचे सगळे लोक आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांनी संयमाने घ्यावे महाराष्ट्र सरकारने योग्य भूमिका घेतली आहे. त्या भूमिकेनुरूप निश्चितपणाने आरक्षण हे मिळेल अशा प्रकारचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी आणि सगळ्या मंत्रिमंडळासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलेला आहे . त्याच्यामुळे सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहिलेले उत्तम अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री पाटील यांनी दिली.