KDMC नगरातील नागरिकांसाठी २१ ठिकाणी लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 11:34 PM2021-06-07T23:34:27+5:302021-06-07T23:54:58+5:30

व्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस पहिल्या डोसनंतर २८ दिवस पूर्ण झाल्यावर घ्यायचा आहे. त्यामुळे ज्यांना पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहे. त्यांनीच लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी केंद्रावर यावे.

Vaccination at 21 places for KDMC citizens | KDMC नगरातील नागरिकांसाठी २१ ठिकाणी लसीकरण

KDMC नगरातील नागरिकांसाठी २१ ठिकाणी लसीकरण

Next

कल्याण- लसीचा साठा उपलब्ध झाल्याने उद्या ८ जून रोजी २१ लसीकरण केंद्रावर नागरीकांसाठी लसीकरण करण्यात येणार आहे. लस उपलब्ध झाली नसल्याने आज लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. कल्याण पूर्व भागातील नेतिवली येथील प्रबोधनकार ठाकरे शाळा, डोंबिवलीतील क्रिडा संकुल आणि कल्याण पश्चिमेतील आटॅ गॅलरी लसीकरण केंद्रावर कोवॅक्सीन लसीच्या दुसऱ्या डोससाठी हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स आणि १८ वर्षावरील नागरीकांसाठी लसीकरणाची व्यवस्था सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत करण्यात आली आहे. को

व्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस पहिल्या डोसनंतर २८ दिवस पूर्ण झाल्यावर घ्यायचा आहे. त्यामुळे ज्यांना पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहे. त्यांनीच लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी केंद्रावर यावे. उर्वरीत १८ लसीकरण केंद्रावर कोविशील्ड लसीची पहिला आणि दुसरा डोस हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स आणि ४५ वर्षावरील नागरीकांसाठी सकाळी १० वाजल्यापासून ते लस उपलब्ध असेर्पयत देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्याचा कालावधी ६ ते ८ आठवडय़ावरुन १२ ते १६ आठवडे करण्यात आला आहे. कोवीशील्डचा पहिला डोस घेून ८४ दिवस झाले असतील अशा नागरीकांनी कोविशील्डचा दुसरा डोस दिला जाणार आहे. कालावधी पूर्ण झाला नसल्यास लस मिळणार नाही. त्यामुळे कालावधी पूर्ण न झालेल्यांनी लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी केंद्रावर गर्दी करुन नये असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. सरकारकडून मिळालेल्या सूचनेनुसार १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांच्या लसीकरणच्या पहिल्या डोससाठी लसीकरण पुढील आदेश मिळेर्पयत स्थगित ठेवले आहे.
 

Web Title: Vaccination at 21 places for KDMC citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.