आमदार गोळीबार प्रकरणात विकी गणात्रा याला अटक
By मुरलीधर भवार | Published: February 7, 2024 05:44 PM2024-02-07T17:44:03+5:302024-02-07T17:44:48+5:30
उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारावर गोळीबार केला होता.
कल्याण- भाजप कार्यकर्ता विकी गणात्रा याला आमदार गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. विकी गणात्रा हा आमदार गणपत गायकवाड यांचा निकटवर्तीय आणि खंदा समर्थक आहे. गोळीबारच्या वेळी विकी गणात्रा हा आमदार गायकवाड यांच्याशी बोलण्याकरीता आला होता. गणपत गायकवाडसह सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये विक्कीचा देखील आहे. या प्रकरणात दोन जण अद्याप फरार आहेत.
उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारावर गोळीबार केला होता. या प्रकरणात आमदारासह संदीप सरवणकर , हर्षल केणे यांनाअटक करण्यात आली होती. आमदाराचा मुलगा वैभव गायकवाड, आमदारांचे सहयोगी विकी गणात्रा आणि नागेश बडेकर फरार असल्याचे सांगण्यात आले होते. आत्ता विकी गणात्रा याला पोलिसांनी अटक केली आहे.
विकी गणात्रा याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. कल्याणमध्ये विकी गणात्रा भाजपचा सक्रीय कार्यकर्ता आहे. त्याच्या भावाकडे भाजपचे पद आहे. कल्याणमध्ये भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमात विकी गणात्रा सहभागी होत होता. भाजप आमदारांप्रमाणे विकी गणात्रा हा केंद्रीय मंत्री कपील पाटील यांचाही निकटवर्तीय आहे. गणात्रा हा बांधकाम व्यावसायिकांच्या धंद्यात आहे. तसेच त्याचे मोबाईल विक्रीचे दुकानही आहे.