Narayan Rane vs Shivsena : नारायण राणेंविरोधात संतापाची लाट; 'कोंबडीचोर' म्हणत शिवसैनिकांनी हवेत भिरकावल्या कोंबड्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 02:15 PM2021-08-24T14:15:45+5:302021-08-24T14:31:23+5:30

Narayan Rane vs Shivsena : डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौकात शिवसेना-युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली.

Video BJP Narayan Rane vs Shivsena Uddhav Thackeray in kalyan Dombivali | Narayan Rane vs Shivsena : नारायण राणेंविरोधात संतापाची लाट; 'कोंबडीचोर' म्हणत शिवसैनिकांनी हवेत भिरकावल्या कोंबड्या 

Narayan Rane vs Shivsena : नारायण राणेंविरोधात संतापाची लाट; 'कोंबडीचोर' म्हणत शिवसैनिकांनी हवेत भिरकावल्या कोंबड्या 

googlenewsNext

कल्याण - भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (BJP Narayan Rane) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून शिवसैनिकांमध्ये चांगलीच संतापाची लाट पसरली आहे. या विधानामुळे मंगळवारी कल्याण -डोंबिवलीमध्येही ठिकठिकाणी सेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी राणे यांना "कोंबडीचोर" असे म्हणत शिवसैनिकांनी हवेत कोंबड्या भिरकावल्या.  

डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौकात शिवसेना-युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली. शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात नारायण राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पुतळ्याला मारहाण करत तसेच कोंबड्या हवेत उडवून यावेळी शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला. तर डोंबिवलीप्रमाणे कल्याण पूर्वेतील गुंजाई चौकातही शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली याप्रकरणी निदर्शने करण्यात आली. नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर यावेळी शिवसेनेने आपला संताप व्यक्त केला. रायगडमध्ये पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद  कल्याण डोंबिवलीमध्येही उमटलेले पाहायला मिळाले. 

डोंबिवलीमध्ये शिवसैनिकांनी नारायण राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा आणि कोंबड्या आणल्या होत्या. हा पुतळा ताब्यात घेताना शिवसैनिक आणि पोलीस यांच्यामध्ये झटापटी देखील झाली. आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी रामनगर पोलीस स्टेशनकडे आपला मोर्चा वळवला मात्र, पोलिसांनी त्याला अडवले. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची निवडणूक देखील जवळ आली असून त्यापूर्वीच सेना भाजप मधील वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात दोन्ही पक्षांमध्ये आणखी कुरघोडीच राजकारण रंगणार यात काही शंका नाही.


 

Web Title: Video BJP Narayan Rane vs Shivsena Uddhav Thackeray in kalyan Dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.