Video: ट्रेन आली तरी गेटमन झोपलेलाच! तरुण पलिकडून आवाज देतोय, शेवटी ट्रॅक ओलांडून सांगावे लागले 

By मुरलीधर भवार | Published: January 4, 2023 03:56 PM2023-01-04T15:56:05+5:302023-01-04T15:56:46+5:30

बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे युवा सेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे या रेल्वे कर्मचाऱ्याच्या निष्काळजपणाबाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Video: train comes and stop, the gateman is still asleep in Dombivali Diva-Vasai route, video goes viral indian railway | Video: ट्रेन आली तरी गेटमन झोपलेलाच! तरुण पलिकडून आवाज देतोय, शेवटी ट्रॅक ओलांडून सांगावे लागले 

Video: ट्रेन आली तरी गेटमन झोपलेलाच! तरुण पलिकडून आवाज देतोय, शेवटी ट्रॅक ओलांडून सांगावे लागले 

googlenewsNext

कल्याण-दिवा वसई या रेल्वे मार्गावर डोंबिवली पश्चिमेला माोठा गाव ठाकूर्ली येथे रेल्वे फाटक आहे. हे फाटक बंद करण्यासाठी असलेल्या कर्मचाऱ्याचा निष्काळजीपणा उघडकीस आला आहे. काल मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास हे फाटक उघडेच होते. एका जागरूक नागरिकाने या ठिकाणी ट्रेन येताना पाहिली. तेव्हा त्याने फाटक शेजारी असलेल्या केबिनमध्ये धाव घेतली यावेळी फाटक उघडण्यासाठी असलेला कर्मचारी झोपलेला असल्याचे दिसून आले .रात्रीची वेळ असल्याने सुदैवाने या ठिकाणी कोणताही अपघात झाला नाही. हा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे युवा सेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे या रेल्वे कर्मचाऱ्याच्या निष्काळजपणाबाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे. या मागणीचे एक ट्वीट रेल्वे प्रशासनास केले आहे.



 

याबाबत रेल्वे प्रशासनाने सदरचा व्हिडीओ कधीचा आहे त्याची सत्यता पडताळण्याचे काम सुरू आहे. मात्र प्रथम दर्शनी हा व्हिडिओ पाहता ही परिस्थिती धोकादायक दिसत नाही. कारण यात ट्रेन फाटका पासून ठराविक अंतरावर थांबलेली दिसत आहे. जेव्हा फाटक उघडे असते त्यावेळी सिग्नल लाल असतो त्यामुळे सहाजिकच लाल सिग्नलला ट्रेन फाटक ओलांडू शकत नाही. जेव्हा फाटक बंद केले जाते तेव्हा हा सिग्नल हिरव्या रंगाचा होतो आणि ट्रेन पुढे जाते. सध्या स्थितीत सिग्नल लाल असल्याने ट्रेन थांबलेली दिसत असल्याचे सांगत या प्रकरणी चौकशी करण्यात येईल.

Web Title: Video: train comes and stop, the gateman is still asleep in Dombivali Diva-Vasai route, video goes viral indian railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.