Video : मुंबई रेल्वे पोलिसांच्या गाडीने घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 08:28 PM2021-10-18T20:28:47+5:302021-10-18T20:29:37+5:30
कल्याण शीळ रोड काटई नाका परिसरात मुंबई रेल्वे पोलिसांच्या गाडीने पेट घेतल्याची घटना घडली. आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ...
कल्याण शीळ रोड काटई नाका परिसरात मुंबई रेल्वे पोलिसांच्या गाडीने पेट घेतल्याची घटना घडली. आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुंबई रेल्वे पोलिसांची व्हॅन कल्याण शीळ रोड काटई नाका येथून कल्याणच्या दिशेने येत होती. या व्हॅनमध्ये गाडी चालकासह आरपीएफचे तीन जवान होते. याच दरम्यान गाडीला आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी तत्काळ गाडीबाहेर पळ काढला. त्यामुळे तिघे ही सुखरुप बचावले.
काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केलं. आगीमुळे जणू फटाके फुटल्याचे आवाज येत होते. त्यामुळे या गाडीत फटाके होते का ? जर असतील तर हे फटाके का आणले होते ?,कुठे नेले जात होते ? असा सवाल उपस्थित झाला आहे. याबाबत संबंधित यंत्रणानी मात्र काही बोलण्यास नकार दिला आहे. दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र, या आगीत व्हॅनचे मात्र नुकसान झाले. या दरम्यान या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
मुंबई रेल्वे पोलिसांच्या गाडीने घेतला पेट; कल्याण शीळ रोड काटई नाका येथील घटना, सुदैवाने जीवितहानी नाही pic.twitter.com/MaOA9B3Kmp
— Lokmat (@MiLOKMAT) October 18, 2021