कवयित्री ज्योती भारती यांच्या ‘बोलावं म्हणतेय’ या काव्यसंग्रहाला विद्रोही साहित्य विचारमंचचा साहित्य पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2022 01:23 PM2022-06-13T13:23:08+5:302022-06-13T13:23:19+5:30

काव्य संग्रहाला ‘नाठाळाच्या माथी हाणू काठी साहित्य पुरस्कार ’ जाहीर झाला आहे.

Vidrohi Sahitya Vicharmanch's Sahitya Puraskar Announced for Poet Jyoti Bharti's Collection of Poems | कवयित्री ज्योती भारती यांच्या ‘बोलावं म्हणतेय’ या काव्यसंग्रहाला विद्रोही साहित्य विचारमंचचा साहित्य पुरस्कार जाहीर

कवयित्री ज्योती भारती यांच्या ‘बोलावं म्हणतेय’ या काव्यसंग्रहाला विद्रोही साहित्य विचारमंचचा साहित्य पुरस्कार जाहीर

googlenewsNext

काव्य संग्रहाला ‘नाठाळाच्या माथी हाणू काठी साहित्य पुरस्कार ’ जाहीर झाला आहे. १६ जून रोजी पुणो येतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात होणा:या विद्रोही साहित्य संमेलनात कवियत्री भारती यांना हा साहित्य पुरस्कार प्रदान केला जणार आहे. त्यामध्ये शमीभा पाटील, मुबारकभाई शेख, विश्वंभर वराट, विजयमाला वाठोरे, सिद्दीकभाई शेख आदी मान्यवरांचा समावेश आहे. तसेच साहित्य पुरस्कारासाठी ज्योती भारती यांच्यासह अभिनेते किरण माने, लेखिका प्रज्ञा बागुल, कवी विकी कांबळे तसेच दैनिक लोकमतचे वरिष्ठ पत्रकार गणोश खंडाळे यांच्या साहित्याची निवड झाली आहे.

लोकमत पुणोचे संपादक संजय आवटे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार असून, जेष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ श्रीपाल सबनीस हे संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत. लेखक, कवी, व्यंगचित्नकार डॉ. सुहासभाई मुळे हे संमेलनाचे प्रमुख पाहुणो असणार आहेत. जेष्ठ कवी, प्रकाशक चंद्रकांत वानखेडे तसेच कवी, दिग्दर्शक हृदयमानव अशोक यांची विशेष उपस्थिती असणार आहे अशी माहिती सचिव अमोल घाटविसावे आणि आयोजक राजू वाघमारे यांनी दिली आहे.

कवियत्री भारती यांच्या बोलावं म्हणतेय, या काव्य संग्रहाला यापूर्वी सोलापूर वडशिवणो येथील गावगाडा साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. ज्येष्ठ विद्रोही साहित्यिक पार्थ पोळके यांच्या हस्ते गावगाडा पुरस्कार नुकताच पुण्यात प्रदान करण्यात आला. याबरोबरच गेल्या वर्षी फेसबुकवरील लॉकडाउनच्या कविता या भारती यांच्या विशेष उपक्र मासाठी न्यायिक लढा पत्नकार संघाकडून त्यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हा पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले. काही वर्तमानपत्रतून भारती यांनी सदर लेखनही केले आहे.

Web Title: Vidrohi Sahitya Vicharmanch's Sahitya Puraskar Announced for Poet Jyoti Bharti's Collection of Poems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण