मध्य रेल्वेचे दक्षता लेखापरीक्षण यशस्वीरित्या पार पडले
By अनिकेत घमंडी | Published: February 7, 2024 05:19 PM2024-02-07T17:19:07+5:302024-02-07T17:20:11+5:30
उत्तर पश्चिम रेल्वेच्या दक्षता पथकाद्वारे मध्य रेल्वेचे मंगळवार, बुधवारी दक्षता लेखापरीक्षण करण्यात आले.
अनिकेत घमंडी, डोंबिवली: उत्तर पश्चिम रेल्वेच्या दक्षता पथकाद्वारे मध्य रेल्वेचे मंगळवार, बुधवारी दक्षता लेखापरीक्षण करण्यात आले. अनिल कुमार गुप्ता, मुख्य दक्षता अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील आणि उत्तर पश्चिम रेल्वे (एनडब्लूआर) च्या वरिष्ठ दक्षता अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या दक्षता पथकाने रेल्वे मंत्रालयाने सुचविलेल्या मापदंडांवर मध्य रेल्वेच्या दक्षता कार्याचे तपशीलवार लेखापरीक्षण केले.
मध्य रेल्वेचे प्रतीक गोस्वामी, मुख्य दक्षता अधिकारी यांनी रेल्वे मंत्रालयाने सुचविलेल्या विविध मापदंडांवर तपशीलवार सादरीकरण केले. त्यानंतर, वाहतूक, लेखा, कार्मिक, स्टोअर्स, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिग्नल आणि दूरसंचार, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय यासारख्या रेल्वेच्या विविध विभागांच्या तपशीलवार कामकाजाचा अभ्यास करण्यासाठी उत्तर पश्चिम रेल्वे (एनडब्लूआर) च्या दक्षता पथकाने दौरा केला.
लेखापरीक्षणादरम्यान, रेल्वेच्या कामकाजात कार्यक्षमता, पारदर्शकता आणि परिणामकारकता सुधारण्यासाठी दोन्ही विभागांमध्ये अनेक कल्पना केल्या. मध्य रेल्वेने तक्रार हाताळणी धोरण तयार केले आहे, जे तक्रारदाराला तक्रार नोंदवताना मार्गदर्शन करते. तसेच, रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दक्षता स्थिती जारी करण्यासाठी ऑनलाइन दक्षता स्थिती व्यवस्थापन प्रणाली नावाचा ‘नवीन ऑनलाइन कार्यक्रम’ वर्षभरात सुरू करण्यात आला. याशिवाय, मुख्य दक्षता निरीक्षकांसाठी चेकलिस्ट, नॉन-व्हिजिलन्स अधिकाऱ्यांसाठी ‘सतर्क अधिकारी’ पुरस्कार आणि नवीन मुख्य दक्षता निरीक्षकांसाठी ओरिएंटेशन कार्यक्रम असे अनेक उपक्रम मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने घेतले.
मध्य रेल्वेच्या दक्षता विभागाने वर्षभरात दक्षता जनजागृतीवर अनेक चर्चासत्रे आयोजित केली आहेत. उत्तर पश्चिम रेल्वे (एनडब्लूआर) टीमने मध्य रेल्वेने सुरू केलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले आहे ज्यामुळे दक्षता व्यवस्थापनाच्या क्षेत्रात परिणामकारकता, कार्यक्षमता आणि पारदर्शकता सुधारली आहे.
उत्तर पश्चिम रेल्वे (एनडब्लूआर) चे दक्षता पथक आता मध्य रेल्वेच्या लेखापरीक्षणाचा तपशीलवार अहवाल रेल्वे मंत्रालय, नवी दिल्ली यांना सादर करणार असल्याचे जनसंपर्क विभागाने सांगितले.