गावकऱ्यांनी दिला ग्रोथ सेंटरला पाठींबा; आमदार राजू पाटील यांनी देखील केली भूमिका स्पष्ट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2022 03:20 PM2022-11-02T15:20:08+5:302022-11-02T15:36:16+5:30

कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात असलेल्या १० गावांमध्ये ग्रोथ सेंटर प्रस्तावित आहे. यासाठी एमएमआरडीएने आराखडा देखील तयार केला आहे.

villagers gave support to the growth center mns mla raju Patil also made his role clear | गावकऱ्यांनी दिला ग्रोथ सेंटरला पाठींबा; आमदार राजू पाटील यांनी देखील केली भूमिका स्पष्ट 

गावकऱ्यांनी दिला ग्रोथ सेंटरला पाठींबा; आमदार राजू पाटील यांनी देखील केली भूमिका स्पष्ट 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क : कल्याण 

कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात असलेल्या १० गावांमध्ये ग्रोथ सेंटर प्रस्तावित आहे. यासाठी एमएमआरडीएने आराखडा देखील तयार केला आहे. मात्र २७ गाव सर्वपक्षीय समितीचा विरोध असल्याने ग्रोथ सेंटर हे रखडले होते. हे ग्रोथ सेंटर होऊ नये म्हणून संघर्ष समिती प्रयत्न करत आहेत. मात्र, दुसरीकडे गावक-यांनी वेगळी भूमिका मांडली आहे.

ग्रामीण भागाच्या योग्य नियोजनासाठी आणि तरुणांच्या रोजगारासाठी ग्रोथ सेंटर आवश्यक असल्याच मतं गावकऱ्यांनी  मनसेचे आमदार राजू पाटील यांच्यासमोर मांडलयं . पाटील यांनीही यावर आपली भूमिका स्पष्ट केलीये.

मनसे आमदार राजू पाटील यांच्या आमदार निधी मधून निळजे गावात रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी निळजे गावातील जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व माजी सरपंच कृष्णा पाटील यांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडे मागणी केली आहे. यावेळी  पाटील म्हणाले कि ' ग्रोथ सेंटरच्या पहिल्या बैठकीला मी उपस्थित होतो. यावेळी सर्वानी या ग्रोथ सेंटरला विरोध केला होता. मात्र ग्रोथ सेंटर बाबत अभ्यास करून मुळ संकल्पनेत बदल करून काही सुधारणांसह ग्रोथ सेंटरला मान्यता देण्या बाबत भूमिका मांडली होती. आता स्थानिकांनाही महत्व पटू लागले आहे. मात्र मी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेन ग्रोथ सेंटरला पाठिंबा दर्शवला होता. मनसे हा एकमेव पक्ष ग्रोथ सेंटरच्या बाजूने उभा होता. ग्रोथ सेंटरला विरोध करत असताना त्याचा अभ्यास करणे खूप गरजेचं असल्याचं मत देखील पाटील यांनी व्यक्त केलय...

२०१५ साली राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता आल्या नंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण ग्रोथ सेंटरची घोषणा केली. १० गावातील १ हजार ८९ हेक्टर जागेवर कल्याण ग्रोथ सेंटर उभारले जाईल. त्यासाठी १ हजार ८९ कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला होता. मात्र अद्याप ग्रोथ सेंटरची एक वीटही  रचली गेली नाही. २७ गाव सर्वपक्षीय विकास समिती या ग्रोथ सेंटरला सतत विरोध करत असल्याने हा प्रकल्प सध्या रखडला आहे. एकीकडे ग्रोथ सेंटरला विरोध होत असताना आता ग्रोथ सेंटरचा वस्तुस्थिती दर्शक अभ्यास करणारे नागरिक मात्र ग्रोथ सेंटरचे समर्थन करू लागलेत बहुतांशी युवकही पाठिंबा देताना दिसून येत आहेत.

Web Title: villagers gave support to the growth center mns mla raju Patil also made his role clear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.