कल्याण ग्रामीणमध्ये जागेच्या वादावरून तुंबळ हाणामारी; कुटुंबावर केला हल्ला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 11:26 PM2021-09-03T23:26:57+5:302021-09-03T23:29:57+5:30

महिला आणि लहान मुलांनाही  मारहाण, शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पागड्याचा पाडा गावात राहणाऱ्या काळोखे  कुटुंबाच्या घरात काही लोकांनी शिरकाव केला

Violent clashes over land dispute in Kalyan Grameen; Attack on family | कल्याण ग्रामीणमध्ये जागेच्या वादावरून तुंबळ हाणामारी; कुटुंबावर केला हल्ला 

कल्याण ग्रामीणमध्ये जागेच्या वादावरून तुंबळ हाणामारी; कुटुंबावर केला हल्ला 

Next

कल्याण - कल्याण डोंबिवली शहरात गेल्या काही दिवसांपासून गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. डोंबिवली नजीक असलेल्या पागड्याचा पाडा गावात एक धक्कादायक घटना घडली असून संपूर्ण गाव दहशतखाली आहे. जमिनीच्या वादातून  येथील एका कुटुंबावर काही इसमांनी प्राणघातक हल्ला केला असून घरातील महिला आणि मुलांनाही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. इतकंच नाही तर घरातील सर्व वस्तूंची तोडफोड देखील  करण्यात आली आहे. या सर्व घटनेचा व्हीडिओ देखील समोर आला आहे. 
 याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. 

शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पागड्याचा पाडा गावात राहणाऱ्या काळोखे  कुटुंबाच्या घरात काही लोकांनी शिरकाव केला आणि अरुण काळोखे त्यांची पत्नी आणि मुलांना  देखील मारहाण करण्यास सुरुवात केली. या  घटनेत दुसऱ्या गटातील एक महिला सुद्धा जखमी झाली आहे. या घटनेचा व्हीडिओ देखील समोर आला आहे.  या  गटातील लोकांनी  घरातील वस्तूंचीही तोडफोड केली  आहे. या  घटनेत दुसऱ्या गटातील एक महिला सुद्धा जखमी झाली आहे. जागेच्या वादातून हा हल्ला झाला असल्याचं अरुण काळोखे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. मात्र जागेचा हा वाद शुक्रवारी विकोपाला गेला आणि अखेर हे प्रकरण पोलीस ठाण्यात  गेले.   सागर फराळ आणि त्यांच्या नातेवाईकांनी हा हल्ला केल्याचा आरोप तक्रारदारांकडून करण्यात आला आहे.  मानपाडा पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.

Web Title: Violent clashes over land dispute in Kalyan Grameen; Attack on family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Familyपरिवार