मौजमजेसाठी चोरायचा ‘तो’ वाहने ! सराईत चोरटा गजाआड; तीन गुन्हे उघडकीस

By प्रशांत माने | Published: June 6, 2024 06:49 PM2024-06-06T18:49:14+5:302024-06-06T18:49:23+5:30

रिक्षा, दुचाकी चोरी करणा-या चोरटयाला विष्णुनगर पोलिसांनी बेडया ठोकल्या

Vishnunagar police arrested a thief who stole rickshaws and two wheelers | मौजमजेसाठी चोरायचा ‘तो’ वाहने ! सराईत चोरटा गजाआड; तीन गुन्हे उघडकीस

मौजमजेसाठी चोरायचा ‘तो’ वाहने ! सराईत चोरटा गजाआड; तीन गुन्हे उघडकीस

डोंबिवली: रिक्षा, दुचाकी चोरी करणा-या चोरटयाला विष्णुनगर पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. विक्रांत जाधव ( वय २८) रा. कल्याण असे अटक आरोपीचे नाव असून तीन गुन्हे उघडकीस आणताना त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी आणि एक रिक्षा जप्त केली आहे. विक्रांत विरोधात यापुर्वी सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक संजय पवार यांनी दिली.

डोंबिवली पश्चिमेकडील शंकेश्वर पाम या बिल्डींगमध्ये राहणारे अरूण राऊत यांची बिल्डींगच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना २५ एप्रिलच्या मध्यरात्री घडली होती. याप्रकरणी विष्णुनगर पोलिस ठाण्यात राऊत यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरटयाविरोधात गुन्हा नोंद झाला होता. वरिष्ठ पोलिस निरिक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्हयाच्या तपासकामी पोलिस उपनिरिक्षक दीपविजय भवर, पोलिस हवालदार शकील जमादार, नितीन भोसले, शंकर मोरे, पोलिस शिपाई शशिकांत रायसिंग आदिंचे पथक नेमण्यात आले होते. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी विक्रांतची माहिती काढून त्याला सापळा लावून पथकाने जेरबंद केले. विक्रांत हा चोरलेल्या दुचाकीचा क्रमांक बदलून तो ती वापरत होता. त्याची अधिक चौकशी करता त्याने याआधी विष्णुनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतच एक रिक्षा आणि अन्य एक दुचाकी चोरल्याची कबुली दिल्याची माहिती उपनिरिक्षक भवर यांनी दिली. विक्रांत मौजमजेसाठी वाहनं चोरायचा असेही तपासात समोर आले आहे.

Web Title: Vishnunagar police arrested a thief who stole rickshaws and two wheelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.