विहिंप, कल्याण जिल्हा राम मंदिरासाठी ३५ कोटी निधी संकलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 12:38 PM2021-01-13T12:38:48+5:302021-01-13T12:39:17+5:30

परिषदेच्या वतीने या अभियानाचे प्रमुख ऍड. मनोज रायचा यांनी ही माहिती दिली.

vishva hindu parishad, Kalyan District will raise Rs 35 crore for Ram Mandir | विहिंप, कल्याण जिल्हा राम मंदिरासाठी ३५ कोटी निधी संकलन करणार

विहिंप, कल्याण जिल्हा राम मंदिरासाठी ३५ कोटी निधी संकलन करणार

googlenewsNext

डोंबिवली: श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्र न्यास कल्याण तर्फे विश्व हिंदू।परिषदेच्या कल्याण जिल्ह्याच्या माध्यमातून ३५ कोटी रुपये निधी संकलन करण्याचा संकल्प करण्यात आल्याची घोषणा मंगळवारी कल्याण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.

परिषदेच्या वतीने या अभियानाचे प्रमुख ऍड. मनोज रायचा यांनी ही माहिती दिली. त्यासाठी सुमारे १७ लाख कुटूंबांपर्यंत पोहचण्याचे आणि त्यातून निधी संकलन करण्याचे उद्दिष्ट आहे. आगामी काळात महिनाभर सुरू होणाऱ्या अभियानाचे ते उद्दीष्ट असल्याचे सांगण्यात आले. जास्तीत जास्त निधी समर्पण करावे असे, आवाहन त्यांनी यानिमित्ताने केले. त्यावेळी विश्र्व हिंदू परिषद कल्याण जिल्हा मंत्री अभिषेक गोडबोले, रोशन जगताप, ॲड सुधा जोशी आदी उपस्थित होते.

Web Title: vishva hindu parishad, Kalyan District will raise Rs 35 crore for Ram Mandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.