शहर सौंदर्यीकरणाचे दृश्य परिणाम येत्या १० दिवसात दिसणार; केडीएमसी शहर अभियंता अर्जुन अहिरे यांची माहिती

By मुरलीधर भवार | Published: November 19, 2022 04:53 PM2022-11-19T16:53:29+5:302022-11-19T16:53:47+5:30

कल्याण डोंबिवलीचा चेहरा- मोहरा बदलून या नगरीला स्वच्छ आणि सुंदर शहरांचा दर्जा मिळवण्यासाठी सध्या केडीएमसी प्रशासन स्तरावर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत.

Visual effects of city beautification will be visible in next 10 days; According to KDMC City Engineer Arjun Ahire | शहर सौंदर्यीकरणाचे दृश्य परिणाम येत्या १० दिवसात दिसणार; केडीएमसी शहर अभियंता अर्जुन अहिरे यांची माहिती

शहर सौंदर्यीकरणाचे दृश्य परिणाम येत्या १० दिवसात दिसणार; केडीएमसी शहर अभियंता अर्जुन अहिरे यांची माहिती

Next

कल्याण-कल्याण डोंबिवलीमध्ये सामाजिक संस्था, अशासकीय संस्था ,प्रतिष्ठित नागरिक यांच्या लोकसहभागातून शहर सौंदर्यीकरणाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. येत्या १० दिवसांत त्याचे दृश्य परिणाम दिसतील अशी माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी आज दिली. शहर सौंदर्यीकरण उपक्रमाअंतर्गत कल्याण पश्चिमेच्या शहाड जकात नाका ते मोहने परिसरात आज सकाळी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

कल्याण डोंबिवलीचा चेहरा- मोहरा बदलून या नगरीला स्वच्छ आणि सुंदर शहरांचा दर्जा मिळवण्यासाठी सध्या केडीएमसी प्रशासन स्तरावर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. या उपक्रमाला आता लोक सहभागाची ही जोड मिळाली असून शहरातील विविध सामाजिक संस्था आणि प्रतिष्ठीत नागरिकांसमवेतच अनेक बांधकाम विकासकांनीही त्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे.

शहर स्वच्छता आणि सौंदर्यीकरण मोहिमे अंतर्गत चौकांचे सुशोभीकरण, दुभाजकांची स्वच्छता व रंगरंगोटी, ट्रॅफिक बेटांचे नूतनीकरण यासोबतच रस्त्याच्या साईडपट्टी साफ करणे, तुटलेले पेव्हर ब्लॉक दुरुस्त करणे, रस्त्यांच्या किनाऱ्यालगतची धूळ साफ करणे अशी कामे केली जाणार असल्याची माहिती शहर अभियंता अर्जुन आहिरे यांनी यावेळी दिली. त्यानुसार आता नेहमीच दुर्लक्षित असल्याची ओरड होणारा दुर्गाडी बायपास परिसरात स्वच्छता आणि सौंदर्यीकरण सुरू झाले आहे.

आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी शहरांच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या नवनविन संकल्पना असल्यास पुढे येऊन त्याबाबत आपला सहभाग नोंदविण्याचे आवाहनही शहर अभियंता अहिरे यांनी यावेळी केले. या मोहिमेत शहर अभियंता अहिरे यांच्यासह घनकचरा विभागाचे उप आयुक्त अतूल पाटील, महापालिका सचिव संजय जाधव, कार्यकारी अभियंता जगदीश कोरे ,प्रशांत भागवत, सहाय्यक आयुक्त राजेश सावंत, सुहास गुप्ते यांच्यासह बांधकाम विकासक विजय रूपावत , मोहीत सिरनानी आदी उपस्थित हाेते.

मोहने येथील स्वच्छता अभियानानंतर शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी आधारवाडी जेल रोड परिसरात असलेल्या तलावाची देखील पाहणी केली. या ठिकाणी महापालिका आणि मोहींदर सिंग काबूल सिंग शाळेच्या एनएसएस पथकामार्फत तलाव आणि आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आल्याचे दिसून आले. या तलाव परिसरात स्वच्छता करूनही वारंवार निर्माल्य आणि प्लास्टिक पिशव्यांसह इतर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे या ठिकाणी येत्या काळात तलाव सुशोभीकरणाचे काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती शहर अभियंता अहिरे यांनी दिली.

Web Title: Visual effects of city beautification will be visible in next 10 days; According to KDMC City Engineer Arjun Ahire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.