अत्रे रंगमंदिर परिसरात माणुसकीची भिंत, आठवडाभरात जमा होतायेत 1 टन कपडे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 04:14 PM2021-01-19T16:14:00+5:302021-01-19T16:14:26+5:30
kalyan : आज कल्याणच्या अत्रे रंग मंदिरात माणुकीची सातवी भिंत सुरु करण्यात आली आहे.
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेने शून्य कचरा मोहीम राबवित असताना आतापर्यंत सहा ठिकाणी माणुसकीची भिंत सुरु केली आहे. आज कल्याणच्या अत्रे रंग मंदिरात माणुकीची सातवी भिंत सुरु करण्यात आली आहे. या माणुसकीच्या भिंतींचा शुभारंभ महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी प्रभाग अधिकारी भागाजी भांगरे, सार्वजनिक आरोग्य अधिकारी ऑगस्टीन घुटे आदी मान्यवर उपस्थित होते.
महापालिकेने शून्य कचरा मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेंतर्गत जुने वापरातील कपडे नागरिकांनी कचऱ्यात टाकू नये. जुने वापरातील कपडे माणुसकीच्या भिंतीच्या ठिकाणी जमा करावे, असे आवाहन केले होते. महापालिका हद्दीत सहा ठिकाणी अशा प्रकारची भिंत सुरु करण्यात आली. या माणुसकीचीच्या भिंतीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आठवडाभरात एक टन जुने वापरातील कपडे माणुसकीची भिंत या उपक्रमात जमा होत आहे. वापरा योग्य असलेले जुने कपडे गरजूंना दिला वाटप केले जात आहे. तर जुने वापरातील कपडेही गोळा केले जात आहे.
जुन्या वापरायोग्य कापडापासून कापडी पिशव्या महिला बचत गटाच्या माध्यमातून शिवून त्या दुकानदारांना पाच रुपये किंमतीत विकल्या जात आहे. त्यातून प्लास्टिक बंदीचा उद्देश साध्य होत आहे. तसेच, कापडी पिशव्या वापरास प्रोत्साहन दिले जात आहे. जुन्या कपडय़ांचा कचरा आता डंपिंगवर जाणे कमी झाले आहे, अशी माहिती उपायुक्त कोकरे यांनी यावेळी दिली आहे.