रेल्वे पास काढायचा आहे?; मग मोठी चूक करु नका, नेमकी काय काळजी घ्यावी जाणून घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 09:32 PM2021-08-11T21:32:45+5:302021-08-11T21:33:33+5:30
एकीकडे राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाच स्वागत सामान्य प्रवाशांनी केलं असल तरी हा निर्णय घ्यायला काहीसा उशीर झाला असल्याची खंतही व्यक्त होत आहे.
कल्याण: राज्य सरकारनं दोन लस घेतलेल्या नागरिकांना 15 ऑगस्ट पासून लोकल प्रवास करायला परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील विविध रेल्वे स्थानकांवर देखील पास काढण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र ,अनेक प्रवाशांचा लसीकरण प्रमाणपत्रावर असलेला क्यू-आरकोड हा स्कॅन होत नसल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचे अनेक प्रकार समोर आले. त्यामुळे ही अडचण टाळायची असेल तर नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत केडीएमसीचे प्रभाग क्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते यांनी नेमक्या काय सूचना दिल्या आहेत.
सुहास गुप्ते यांनी काय सूचना दिल्या आहेत. त्यामुळे तुमचा क्यू आर कोड व्यवस्थित स्कॅन होण्यासाठी रेल्वे।स्थानकात प्रवेश करण्या अगोदर सर्व गोष्टींची खातरजमा करणे आवश्यक आहे , जेणेकरून तुम्हाला वारंवार रेल्वे स्थानकावर जावं लागणार नाही. एकीकडे राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाच स्वागत सामान्य प्रवाशांनी केलं असल तरी हा निर्णय घ्यायला काहीसा उशीर झाला असल्याची खंतही व्यक्त होत आहे.
एकीकडे कल्याण डोंबिवली मध्ये लसीच्या दुसऱ्या डोससाठी नागरिकांना संघर्ष करावा लागतोय तर रेल्वे पास साठीही रांगेत उभं राहावं लागतंय. कोरोना काळ सुरू झाल्यापासून औषधपासून ऑक्सिजन, बेड, रुग्णवाहिका तेथेट स्मशानापर्यँत सामान्य नागरिकांच्या नशीबी रांग होती..आता लसीसाठी आणि पास मिळवण्यासाठीही रांगेत उभ राहावं लागतंय. पण आता तरी शहरातील लसीकरणाबाबत राज्य आणि केंद्र सरकारनं लक्ष द्यावे जेणेकरून समान्यांचा रेल्वे प्रवास सुकर होईल अशा भावना व्यक्त होत आहे.