डोंबिवलीतील राजूनगर आणि गरीबाचा वाडा परिसरात पाणी टंचाई

By मुरलीधर भवार | Published: January 2, 2023 06:03 PM2023-01-02T18:03:23+5:302023-01-02T18:04:46+5:30

पाणी समस्येच्या संदर्भात म्हात्रे यांनी आज महापालिका प्रभारी आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पाणी समस्या सोडविण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याच्या फाईलचा कसा जाडजूड ग्रंथ झाला आहे. तो दाखविला.

Water scarcity in Rajungar and Garibacha Wada areas of Dombivli | डोंबिवलीतील राजूनगर आणि गरीबाचा वाडा परिसरात पाणी टंचाई

डोंबिवलीतील राजूनगर आणि गरीबाचा वाडा परिसरात पाणी टंचाई

googlenewsNext

कल्याण - डोंबिवली पश्चिमेतील राजूनगर आणि गरीबाचा वाडा या परिसरातील नागरीकांना ३० टक्केही पाणी मिळत नाही. या भागातील पाणी समस्या सोडविली नाही तर कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे माजी नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी दिला आहे. 

पाणी समस्येच्या संदर्भात म्हात्रे यांनी आज महापालिका प्रभारी आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पाणी समस्या सोडविण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याच्या फाईलचा कसा जाडजूड ग्रंथ झाला आहे. तो दाखविला. आयुक्त चितळे यांनी ही समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. मात्र समस्या सुटली नाही तर आंदोलन करण्यावर ठाम असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. 
 

Web Title: Water scarcity in Rajungar and Garibacha Wada areas of Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.