जलवाहिनीचे काम सुरू; शनिवार दुपारपर्यंत MIDC चा पाणीपुरवठा बंद
By अनिकेत घमंडी | Published: May 9, 2023 02:58 PM2023-05-09T14:58:34+5:302023-05-09T15:20:27+5:30
आधीच कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत मंगळवार, ९ मे पासून पुढील सूचना मिळेस्तोवर पाणी कपात सुरू करण्यात आली आहे.
डोंबिवली: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बारवी धरणाच्या मुख्य जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे काम १२ मे रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारी १२ वाजल्यापासून ते शनिवारी दुपारी१२ वाजेपर्यंत २४ तास डोंबिवलीएमआयडीसी, केडीएमसी, उल्हासनगर महापालिका, तळोजा एमआयडीसी, परिसरातील ग्रामपंचायती आदींना जांभूळ जलशुद्धी केंद्रतून होणारा पाणी।पुरवठा त्या कालावधीत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसीच्या पाणी पुरवठा विभागाने मंगळवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली.
आधीच कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत मंगळवार, ९ मे पासून पुढील सूचना मिळेस्तोवर पाणी कपात सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात पाणी टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यात कधी एमआयडीसी यंत्रणा पाणी।पुरवठा वाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कारणाने पाणी पुरवठा बंद ठेवते तर महावितरण यंत्रणा देखील वीज खंडित करत असल्याने अनेक सोसायट्यांमधील गच्चीवरील टाक्यात पंपाद्वारे पाणी चढवले जात नसल्याने पाणी समस्या भेडसावत आहे, आशा अनेक कारणांनी पाणी टँचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत असल्याने या ठिकाणी शासकीय यंत्रणांच्या भोंगळ कारभारावर नाराजी व्यक्त होत आहे.