जलवाहिनी रात्री अचानक फुटली, दुरुस्तीनंतर पाणीपुरवठा पूर्ववत

By अनिकेत घमंडी | Published: June 11, 2024 11:17 AM2024-06-11T11:17:56+5:302024-06-11T11:33:06+5:30

गेल्या आठवड्यापासून डोंबिवलीसह कल्याण शहरात अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

Water supply will be cut off in Kalyan due to water channel burst!  | जलवाहिनी रात्री अचानक फुटली, दुरुस्तीनंतर पाणीपुरवठा पूर्ववत

जलवाहिनी रात्री अचानक फुटली, दुरुस्तीनंतर पाणीपुरवठा पूर्ववत

डोंबिवली: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बारावे येथील जलशुद्धीकरण केंद्राला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी रात्री अचानक शहाड येथे मोठ्या प्रमाणात फुटल्याने मंगळवारी सकाळी ६.०० वाजल्यापासून पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. चार तासांनी दुरुस्ती केल्यानंतर पाणी पुरवठा पूर्ववत करण्यात आल्याचे महापालिकेने जाहीर केले. या कालावधीमध्ये कल्याण पश्चिम आणि कल्याण पूर्व विभागाचा पाणीपुरवठा बंद राहणार होता. तरी  बाधीत नागरिकांनी या बाबत महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले होते.

गेल्या आठवड्यापासून डोंबिवलीसह कल्याण शहरात अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. मनपाने अनधिकृत नळजोडण्यांवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची धडक कारवाई केली होती. महापालिका आयुक्त  डॉ. इंदु राणी जाखड़ यांच्या निर्देशानुसार आज पाणी पुरवठा विभागामार्फत कल्याण पश्चिम येथील दुर्गाडी किल्ला ते रेतीबंदर ते पत्रीपुल दरम्यानच्या ११०० मी.मी. व १४०० मी.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील तबेले धारकांनी घेतलेल्या अनधिकृत नळजोडण्या खंडीत करणेची कारवाई करण्यात आली. १, १.५ व २ इंची  व्यासाच्या एकुण ४८ अनधिकृत नळजोडण्या पोलीस बंदोबस्तात खंडीत करण्यात आल्या.  

शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता (पाणी पुरवठा) अशोक घोडे व शैलेश मळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण व डोंबिवली विभागातील उप अभियंता, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता व कर्मचारी यांनी सदर कारवाई पार पाडली होती. ही कारवाई केल्याने कल्याण पूर्व विभागाच्या पाणी पुरवठयात वाढ होणार आहे. तसेच सदर अनधिकृत नळजोडण्या पुन्हा होवू नयेत याबाबत महानगरपालिकेकडून विशेष दक्षता घेण्यात येईल अशी माहिती पाणीपुरवठा विभागामार्फत देण्यात आली होती, त्या कारवाईत सातत्य राखावे अशी मागणी नागरिकांनी केली.

Web Title: Water supply will be cut off in Kalyan due to water channel burst! 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.