मराठा समाजाला आरक्षण देण्यात आमचा विरोध नाही, पण आमचे आरक्षण हिरावून घेऊ नका

By मुरलीधर भवार | Published: September 13, 2023 04:44 PM2023-09-13T16:44:06+5:302023-09-13T16:44:25+5:30

कल्याण तालुका ओबीसी महासंघाची मागणी

We are not against giving reservation to Maratha community, but don't take away our reservation - OBC Mahasangh | मराठा समाजाला आरक्षण देण्यात आमचा विरोध नाही, पण आमचे आरक्षण हिरावून घेऊ नका

मराठा समाजाला आरक्षण देण्यात आमचा विरोध नाही, पण आमचे आरक्षण हिरावून घेऊ नका

googlenewsNext

कल्याण-मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोधात नाही. तर ओबीसी संवर्गातील कुणबी यांचे आरक्षण हिरावून घेऊन ते मराठा समाजाला देण्यास आमचा विरोध असल्याची भूमिका कल्याण तालुका ओबीसी महासंघोन घेतली आहे.

या मागणीसठी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ओबीसी कुणबी समाजाचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते. सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिष्टमंडळाने कल्याणच्या तहसीलदार जयराज देशमुख यांना एक निवेदन सादर केले. समाजाची काय मागणी आहे ती राज्य सरकारपर्यंत पोहचविण्यात यावी असे यावेळी शिष्टमंडळाने सांगितले. ओबीसी प्रवर्गात ३४६ जाती येतात.

ओबीसींना एकूण १९ टक्के आरक्षण मिळते. हे आरक्षण काढून ते मराठा समाजाला दिल्यास ते ओबीसी समाजाचे आरक्षण हिरावून घेतल्या सारखे होईल. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा वेगळा विचार करुन त्यांना आरक्षण द्यावे. ओबीसी आरक्षणाचा कोटा कमी करु नये. आमच्या ओबीसीचे केंद्रात खासदार आहेत. तसेच राज्यात आमदार आहे. या मंडळींकडून याविषयी कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही. याविषयी सामाजिक कार्यकर्ते जाधव यांनी खंत व्यक्त केली आहे.

Web Title: We are not against giving reservation to Maratha community, but don't take away our reservation - OBC Mahasangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.