पश्चिम रेल्वेने पुढाकार घेत जपले स्रीदाक्षिण्य; महिलांना जादा २५ आसनांची सुविधा, मध्य रेल्वे मात्र पिछाडीवर

By अनिकेत घमंडी | Published: October 14, 2022 11:28 AM2022-10-14T11:28:48+5:302022-10-14T11:30:32+5:30

पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून एसी लोकलसह दिवसाला सुमारे १३७० लोकल फेऱ्या चर्चगेट ते विरार अप डाऊन मार्गावर होतात.

western railway took the initiative and 25 more seats facility for women but central railway lags behind | पश्चिम रेल्वेने पुढाकार घेत जपले स्रीदाक्षिण्य; महिलांना जादा २५ आसनांची सुविधा, मध्य रेल्वे मात्र पिछाडीवर

पश्चिम रेल्वेने पुढाकार घेत जपले स्रीदाक्षिण्य; महिलांना जादा २५ आसनांची सुविधा, मध्य रेल्वे मात्र पिछाडीवर

Next

अनिकेत घमंडी

डोंबिवली : महिला रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने एसी लोकल वगळता अन्य सर्व नॉन एसी लोकल फेऱ्यांमध्ये खास महिलांसाठी २५ आसनांची जास्तीची सुविधा देऊ करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे, त्यात प्रामुख्याने विरार एन्डकडील दुसरा डब्यालगत तसेच चर्चगेटवरून लोकल निघताना साधारण ९-१० वा डबा अशी त्याची रचना असेल असेही स्पष्ट करण्यात आले, पण मग जे पाश्चिम रेल्वेला।जमले ते मध्य रेल्वेला का नाही जमले, पश्चिम रेल्वेने पुढाकार घेत स्रीदक्षिण्य जपले तर मध्य रेल्वे का पिछाडीवर आहे असा सवाल ठिकठिकाणच्या प्रवासी संघटनांनी विचारला असून नाराजी व्यक्त केली.

पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून एसी लोकलसह दिवसाला सुमारे १३७० लोकल फेऱ्या चर्चगेट ते विरार अप डाऊन मार्गावर होतात. त्यापैकी ७९  फेऱ्या या एसी लोकलच्या असून त्या वगळता सुमारे १२९० लोकल फेऱ्या या नॉन एसी लोकल आहेत, त्या सर्व सर्व्हिसेसमध्ये महिलांसाठी २५ आसनांची क्षमता वाढवण्यात आली असून त्यासाठीच्या कंपर्टमेंटची व्यवस्था करण्यात आली असल्याचे पश्चिम रेल्वेने जाहीर केले.

मध्य रेल्वे वरून देखील महिला प्रवाशांची संख्या ही लाखोंच्या घरात असून त्या महिला प्रवाशांना रोजच्या प्रवासात असंख्य अडचणी येतात, त्या अडचणींमध्ये गाडीत प्रवेश मिळणे आणि आसन मिळणे हे दुरापास्त होत चालले असल्याचे सर्वत्र गंभीर चित्र आहे.

त्यासाठीच गर्दीच्या वेळेत महिला विशेष लोकल चालवण्यात याव्यात अशी मागणी प्रवासी संघटना २०१२ पासून करत आहेत. तत्कालीन खासदार, रेल्वेचे अभ्यासक आनन्द परांजपे यांनीही या प्रश्नावरून संसदेत महिलांची बाजू मांडली होती, मात्र तरीही तेव्हापासून आता २०२२ पर्यन्त गेल्या दहा वर्षात एकही।महिला विशेष लोकल वाढली नाही. त्या तुलनेत गेल्या १० वर्षात महिला रेल्वे प्रवाशांची संख्या तिपटीने वाढलेली असून त्यात आबालवृद्ध महिलांचा समावेश आहे, शाळा, कोलेज, उच्चविद्या यांसह नोकरीला जाणाऱ्या लाखो युवती,महिलांची  रोजच्या गर्दीच्या प्रवासात मोठी अडचण होत आहे. 

पुरुषांना जवळपास ८ डबे असून त्यात फर्स्टक्लासचे देखील मोठे डबे आहेत, त्यामुळे कोणत्या ना कोणत्या डब्यात कसाबसा प्रवेश मिळतो तरी मात्र।महिलांना महिला डब्यात प्रवेश मिळाला नाही तर पुरुषांच्या डब्यातून नाईलाजाने जरी प्रवास करावा लागला तरी त्यांची कुचंबणा।होते, त्यामुळे असंख्य महिला प्रवासी।पुरुषांच्या डब्यातून प्रवास करणे टाळतात. अनेक महिला कामाच्या ठिकाणची वेळ जरी १०, १०.३० असली तरीही घरातून लवकर निघून गर्दी टाळून लेडीज डब्यात प्रवेश मिळवण्यासाठी धडपड करतात, पण यामध्ये त्यांचा कौटुंबिक वेळ देणे यांसह स्वतःकडे लक्ष देता येत नसल्याने कौटूंबिक व शारीरिक समस्यांकडे त्याना वेळ देता येत नाही ही देखील पंचाईत होते, या सगळ्या तांत्रिक अडचणी समजून कोणी घेत नसल्याने देखील महिलांनी नाराजी व्यक्त केली. महिला।लोकल डबे मध्य रेल्वेने देखील तात्काळ वाढवावेत अशी मागणी जोर धरत आहे.

रेल्वेने नेहमीच प्रवाशांना सापत्न वागणूक दिली आहे, कोणतीही सुविधा सुरू होताना ती पाश्चिम रेल्वेवर आधी सुरू होते. वास्तविक पाहता मध्य रेल्वेवर प्रवासी संख्या जास्त असून लोकल फेऱ्या देखील।सुमारे १८००च्या वर आहेत, सर्वाधिक निधी येथून रेल्वेला।मिळतो, त्यामुळे येथील।महिला प्रवाशांना देखील न्याय मिळायला हवा ही प्रवासी संघटनेची मागणी ठाम आहे : नंदकुमार देशमुख, अध्यक्ष ठाणे रेल्वे प्रवासी संघटना.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: western railway took the initiative and 25 more seats facility for women but central railway lags behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.