कल्याण डोंबिवलीतील राजकारण्यांना झालं तरी काय?; लोकप्रतिनिधींना सूट अन् जनतेची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 05:09 PM2021-03-24T17:09:37+5:302021-03-24T17:09:50+5:30

परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब नंतर भाजपाने राज्य सरकार विरोधात कल्याण डोंबिवलीत आंदोलन केली.

What happened to the politicians of Kalyan Dombivali ?; Loot to people's representatives and robbery of the people | कल्याण डोंबिवलीतील राजकारण्यांना झालं तरी काय?; लोकप्रतिनिधींना सूट अन् जनतेची लूट

कल्याण डोंबिवलीतील राजकारण्यांना झालं तरी काय?; लोकप्रतिनिधींना सूट अन् जनतेची लूट

Next

- मयुरी चव्हाण

कल्याण: कल्याणडोंबिवली शहरात कोरोना रुग्णांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. जिल्ह्यात ठाणे शहरासह कल्याण डोंबिवलीत आतापर्यंत कोरोना रुग्णांची उच्चांक नोंद करण्यात आली आहे. एकीकडे पालिका प्रशासन कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना राजकीय पक्षांकडूनच नियमांना हरताळ  फासला जात असल्याच दिसून येत. त्यामुळे नियम मोडला म्हणून नागरिकांकडून पावत्या फडल्या जात असताना राजकीय कार्यक्रमांना  सूट दिली जात असल्याची चर्चा शहरात सुरु आहे.  जनतेची लूट आणि लोकप्रतिनधिंना सूट  असे चित्र कल्याण डोंबिवलीत दिसून येत आहे.
 
परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब नंतर भाजपाने राज्य सरकार विरोधात कल्याण डोंबिवलीत आंदोलन केली. यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टसिंगचे अजिबात पालन केल नव्हतं ,अनेकांचे मास्कही हनुवटीवर होते. तर वडवली पुलाचे उदघाटन करताना मनसेकडूनही सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडालेला दिसला. बैलाच्या वाढदिवासाला जमवलेली गर्दी, लोकप्रतिनिधींचे वाढदिवस, हळदी कुंकू समारंभ यामुळे आधीच कल्याण डोंबिवलीत नेमकं चाललंय तरी  काय? असा सवाल निर्माण झाला होता आता लोकांचे प्रतिनिधित्व करणारी राजकीय मंडळीच गर्दी जमवून कोरोनाला आमंत्रण देत आहेत. 

खरं तर शहरात आंदोलन होत असताना पोलीस  प्रशासनाला याची कुणकुण लागत नाही हे नवलच म्हणावं लागेल. इतकेच नाही तर गर्दीच्या ठिकाणांवर  नजर ठेवण्यासाठी नेमण्यात आलेली पालिकेची पथकंही अशा वेळी कुठं जातात हा देखील संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे आधी  राजकीय कार्यक्रमांवरच आवर घालण्याची गरज आहे.  

Web Title: What happened to the politicians of Kalyan Dombivali ?; Loot to people's representatives and robbery of the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.