सहज कुठे तरी भेट झाली म्हणून पतंग उडविण्यात काय अर्थ आहे; विनोद तावडे यांचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 06:00 PM2021-07-30T18:00:35+5:302021-07-30T18:00:59+5:30
कल्याण पूर्व भागात भाजपच्या कार्यकत्र्याचा मेळावा आज शुक्रवारी पार पडला.
कल्याण- प्रत्येक पक्षाची एक भूमिका असते. नाशिकमधील मनसेने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. राज ठाकरे आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची पुण्यात सहज भेट झाली. त्यावरुन पतंग उडविण्यात काय अर्थ आहे असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय सचिव व माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी येथे केले.
कल्याण पूर्व भागात भाजपच्या कार्यकत्र्याचा मेळावा आज शुक्रवारी पार पडला. यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार, माजी मंत्नी जगन्नाथ पाटील, कल्याण मंडळ अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, राजन वारे, अभिजित करंजुले, राजू कवठाऴे, जिल्हा सरचिटणीस भारत फुलोरे, अर्जुन म्हात्रे, युवा जिल्हाध्यक्ष मिहीर देसाई, महिला अध्यक्ष नगरसेविका रेखा चौधरी उपस्थित होते.
भाजपचे राष्ट्रीय सचीव तावडे हे गेल्या दोन वर्षापासून राजकारणात दिसत नव्हते. याबाबत पत्रकारांनी त्यांच्याकडे विचारणा केली असता तावडे यांनी सांगितले की, त्यांच्याकडे पक्षाने हरियाणाची जबाबदारी दिली होती. त्यासाठी ते हरियाणा येथे जात येत होते. महाराष्ट्रात तावडे दहा दिवस असतात. त्या वेळेत ते पक्षाच्या कामासाठी महाराष्ट्रातील कार्यकत्र्याना वेळ देतात. निवडणूका आल्या म्हणून हा मेळावा घेतला आणि मार्गदर्शन केले असे नाही असे स्पष्ट केले. दरम्यान तावडे यांचे दुर्गाडी चौकात जोरदार स्वागत झाले. त्यानंतर त्यांनी माजी आमदार पवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्याचबरोबर शहरातील शिक्षण क्षेत्रतील अनेक मान्यवरांनी त्यांची भेट घेतली. शिक्षण या विषयावर त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली.