महिलेचे अपहरण करुन तिची अब्रू लूटत असताना पोलिसांनी घातली त्या दोन नराधमांवर झडप

By मुरलीधर भवार | Published: September 9, 2023 04:48 PM2023-09-09T16:48:20+5:302023-09-09T16:48:54+5:30

मानपाडा पोलिस ठाण्यातील या धाडसी पोलिसांच्या कामगिरीची कौतूक होत आहे.

while kidnapping the woman and robbing her the police raided the two murderers | महिलेचे अपहरण करुन तिची अब्रू लूटत असताना पोलिसांनी घातली त्या दोन नराधमांवर झडप

महिलेचे अपहरण करुन तिची अब्रू लूटत असताना पोलिसांनी घातली त्या दोन नराधमांवर झडप

googlenewsNext

मुरलीधर भवार, डाेंबिवली- खिडकाळेश्वर मंदिरात महिला देवदर्शनाकरीता गेली होती. देवदर्शन करुन रिक्षाने घरी परत जात असताना दोन जणांनी तिचे अपहरण केले. अपहरण करुन तिला निर्जन स्थळी नेले. तिची अब्रू लूटण्याच्या प्रयत्नात असताना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्या दोन नराधमांवर झडप घातली. त्या दोन नराधमांनी पोलिसांवरही जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात एक पोलिस जखमी झाला आहे. हल्ला झाला तरी पोलिसांनी त्या दोघांना जेरबंद करुन महिलेची त्यांच्या तावडीतून सुटका करीत तिची अब्रू वाचविली. अटक करण्यात आलेल्या नराधमांची नावे प्रभाकर पाटील आणि वैभव तरे अशी आहेत. मानपाडा पोलिस ठाण्यातील या धाडसी पोलिसांच्या कामगिरीची कौतूक होत आहे.

महिला काल सायंकाळी कल्याण शीळ रोडलगत असलेल्या खिडकाळेश्वर मंदिरात देवदर्शनाकरीता गेली होती. दर्शन घेऊन ती रस्त्यावर आली. घरी परत जाण्यासाठी तिने एका रिक्षा चालकाला हात दाखविला. रिक्षा चालकाने तिला रिक्षात बसविले. महिला रिक्षात बसण्यापूर्वीच रिक्षात आधीच एक प्रवासी बसला होता. महिलेने तिला कोळेगावात जायचे असे रिक्षा चालकाला सांगितले. रिक्षाचालकाने रिक्षा कोळेगावच्या घेतली. मात्र थोड्याच अंतरावर रिक्षा पुढे गेली. तेव्हा रिक्षा चालकाने रिक्षा एका निर्जनस्थळाकडे वळवली. जेव्हा महिले त्याला विचारले की कुठे जातो. तेव्हा शेजारी बसलेल्या प्रवासाने त्याच्याजवळील धारदार शस्त्र काढून तिच्या तोंडावर ठेवले. दोन्ही हाताने तिचे तोंड दाबून धरले. रिक्षात हा प्रकार सुरु असताना रिक्षा जेव्हा निर्जनस्थळी जात होती. याच दरम्यान मानपाडा पोलिस ठाण्याचे गस्तीवर असलेले पोलिस सुधीर हसे आणि अतुल भोई यांनी पाहिले. तोपर्यंत रिक्षा पुढे निघून गेली होती. मात्र या दोन्ही पोलिसांना रिक्षा निर्जनस्थळी का जात आहे ? याचा संशय आला.

दोघांनी रिक्षा ज्या दिशेने गेली आहे. त्याच दिशेने दुचाकी फिरविली. रिक्षाचा माग काढत थोड्याच वेळात हे दोघे पोलिस रिक्षा जवळ पोहचले. मात्र त्यांनी पाहिले की, महिलेसोबत दोन जण अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करीत आहे. हे पाहताच त्या दोन्ही पोलिसांनी त्यांच्या दिशेने झडप घेतली. दोघेे नराधम आणि पोलिसांत हाणामारी झाली. दोघा नराधमांनी एका पोलिसावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात पोलिस सुधीर हसे हे गंभीर जखमी झाले. तरी देखील त्यांनी त्या दोघा नराधमांना पोलिसांनी सोडले नाही. पकडून ठेवले. मानपाडा पोलिस ठाण्याला याची माहिती दिली. लगेचच मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुरेश मदने हे घटनास्थळी दाखल झाले.

दोघाही नराधमाना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये प्रभाकर पाटील हा नराधम कल्याण ग्रामीणमधील उसरघर परिसरात राहतो. तो रिक्षा चालवितो. त्याचा साथीदार वैभव तरे हा देखील रिक्षा चालक आहे. वैभव याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. तो दिवा येथील आगासन येथे राहणारा आहे. मानपाडा पोलिसांनी प्रसंगावधान राखत जे धाडस दाखविले त्यामुळे एका महिलेचा जीव आणि अब्रू वाचविली. धाडसी कामगिरी करणारे पोलिस सुधीर हसे आणि अतुल भोई यांचे पोलिसांकडून कौतूक करण्यात आले आहे.
 

Web Title: while kidnapping the woman and robbing her the police raided the two murderers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.