गणेश नाईक यांच्या त्या वक्तव्याचा गैरसमज करु घेऊ नये, असे मनसे आमदार राजू पाटील का म्हणाले?
By मुरलीधर भवार | Published: September 2, 2024 05:58 PM2024-09-02T17:58:55+5:302024-09-02T17:59:25+5:30
कल्याण- १४ गावांबद्दल गणेश नाईक यांच्या त्या वक्तव्याचा गैरसमज करुन घेऊ नये. त्यांच्या काही अटी शर्ती आहेत. त्यांची मागणी ...
कल्याण- १४ गावांबद्दल गणेश नाईक यांच्या त्या वक्तव्याचा गैरसमज करुन घेऊ नये. त्यांच्या काही अटी शर्ती आहेत. त्यांची मागणी देखील रास्त आहे. परंतू त्याचा अर्थ असा नाही की, गणेश नाईक यांनी १४ गावांना नवी मुंबईत समाविष्ट करुन घेण्यास आणि विकासाला विरोध केला आहे असा त्याचा अर्थ होत नाही. तर गणेश नाईक हे सकारात्मक आहेत. गावांचा विकास कुठे थांबणार नाही. मी स्वत: मुखमंत्र्यांना भेटून विकास निधी मंजूर करुन घेणार. त्या गावात विकास कामे सुरु होणार, अशी भूमिका मनसे आमदार राजू पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
आमदार पाटील यांनी सांगिले की, गणेश नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊली. त्यात त्यांनी १४ गावे नवी मुंबईत घेतली आहेत. त्याबाबतीत त्यांच्या काही अटी शर्ती आहे. त्याची पूर्तता झाल्या शिवाय ही महापालिकेत गावे घेऊ नये. विकास कामे सुरु करु नये. खरे तर नाईक यांची ही भूमिका महत्वाची आहे. १४ गावातील नागरीकांचे ऐकून त्यांनी समर्थन केले आहे. विधी मंडळात २४ मार्च २०२२ रोजी मी प्रश्न मांडला. नाईक हे तेव्हाही बोलले होते. महापालिका आयुक्तांनी जे पत्र दिले होते. त्यात स्पष्ट म्हटले होते. ५९१ कोटी गावांच्या विकासासाठी आणि ६ हजार ९०० कोटी रुपये गावाच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी देण्यात यावे. तीच मागणी ते पुढे रेटत आहे. या गावातील नागरीकांचा गैरसमज झाला आहे. नाईक यांचा ही गावे काढण्यास विरोध आहे का ? तर नाही. त्यामुळे माझे असे ठाम मत आहे की नाईक यांचा त्याला विरोध नाही. त्यांची मागणी रास्त आहे. परंतू हा पैसा एकदम असा ठपकन येऊन पडणार नाही. टप्प्या टप्प्याने विकास कामे सुरुही होतील. मुख्यमंत्रीनी ७० कोटी रुपये नगरविकास खात्याकडून आणि ७० कोटी रुपये एमएमआरडीएच्या माध्यमातून मंजूर केले होते. ही कामे सुरु करण्यासाठी एक निधी वितरीत करावा. आडीवली भूतविली रस्त्याचे काम सुरु करण्यासाठी निधी द्यावा. महापालिका आयुक्तांना भेटलो होतो. १४ गावे आणि तळोजा रोडला जोडणारा एक स्पाईन रोड हवा आहे. त्याला काही काळ जाणार आहे. तेव्हढा काळ ही गावांना विकासापासून ताटकळत ठेवणे याेग्य होणार नाही. त्या रस्त्याचा प्रस्तावही टाकण्यास सांगू. ही कामे होणार आहेत.
आम्ही नाईक यांची समजूत काढणार आहोत. त्यांना आम्ही समजून घेतले आहे. ते ही आम्हाला समजून घेतील. भावना दोघांची सारखीच आहे. त्यांचे म्हणणे यासाठी रास्त वाटते की, नवी मुंबई महापालिकेतील नागरीकांचा गेली २० वर्षे ट’क्स वाढलेला नाही. त्या लोकांवर त्यांना बोजा टाकायचा नाही. ते काही चूकत नाही. इथली कामे सुुरु झाल्यावर त्या कामाकरीता सरकारकडून पैसा आल्यावर तो बोझा नवी मुंबईतील नागरीकावर पडणार नाही. जी लोकसंख्या प्रिडीक्ट करीत आहे. तेव्हढी लोकसंख्या या १४ गावाची नाही. नवी मुंबई ही देशातील मोठी महापालिका आहे. त्या ठिकाणी ही अतिक्रमणाचा विषय आहे. तो जसा टप्प्या टप्प्याने संपणार आहे. नाईक एक मवाळ भूमिका घ्यावी. आमचे आणि आमच्या समाजाचे ते नेते आहेत. त्यांच्या भूमिकेला पाठींबा देत मुख्यमंत्र्यांकडून जास्तीत जास्त निधी या १४ गावांच्या विकासाला कसा येईल यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.