डोंबिवली स्टेशन परिसरात पाणी का साचते?
By मुरलीधर भवार | Published: August 3, 2023 08:45 PM2023-08-03T20:45:54+5:302023-08-03T20:46:07+5:30
डोंबिवली स्टेशन परिसरात यापूर्वी पाणी साचत नव्हते.
डोंबिवली : डोंबिवली स्टेशन परिसरात पावसाचे पाणी का साचते ? यावर उपाय योजना करण्यासाठी काल सायंकाळी माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी शहर अभियंता अर्जून अहिरे यांच्यासोबत पाहणी केली. या पाहणी पश्चात पाणी साचण्याची कारणे समोर येताच त्यावर उपाययोजना करण्यास आज सकाळपासून सुरुवात करण्यात आली आहे.
डोंबिवली स्टेशन परिसरात यापूर्वी पाणी साचत नव्हते. मात्र आत्ता जरा देखील जास्त पाऊस पडला तर स्टेशन परिसरातील अनुकूल हॉटेल ते राथ रोड परिसरात पाणी साचते. या साचलेल्या पाण्यातून नागरीकांना वाट काढावी लागते.
तसेच साचलेले पाणी थेट दुकानदारांच्या दुकानात शिरते. त्यामुळे दुकानदारांचे नुकसान होत आहे. नागरीकांना भेडसावणारी समस्या पाहता. या समस्येवर तोडगा काढण्याकरीता माजी स्थायी समिती सभापती म्हात्रे यांनी पाहणी केली. यावेळी शहर अभियंता अहिरे हे देखील उपस्थित होते. रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या लाईनचे काम मार्गी लागल्यावर स्टेशन परिसरात पाणी साचण्याचे प्रकार घडू लागले. स्टेशन परिसरातील मेन होल्स चोक अप झाल्याचे दिसून आले. त्याचबराेबर रेल्वे मार्गाखालून गेलेली ड्रेनेज लाईन खुली करावी लागणार असल्याच्या बाबी समोर आल्या. या संदर्भात तातडीने आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याशी देखील संपर्क साधण्यात आला. आयुक्तांच्या आदेशानुसार शहर अभियंते अहिरे यांनी स्टेशन परिसरातील चोकअप असलेल्या मेन होल्स चे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचबरोबर रेल्वेच्या खालून जाणारी ड्रेनेज लाईन खुली केली जाणार आहे. हे काम मार्गी लावल्यावर स्टेशन परिसरात पाणी साचण्याच्या समस्येवर मात करणे शक्य होणार आहे.