पत्नीचा जळून मृत्यू, पतीची निर्दोष सुटका; कल्याण न्यायालयाचा निकाल
By सचिन सागरे | Published: March 28, 2024 05:53 PM2024-03-28T17:53:09+5:302024-03-28T17:53:19+5:30
मे २००५ मध्ये अंबरनाथ येथे राहत असलेल्या वर्षा यांचे पती विष्णू यांच्य्यासोबत किरकोळ कारणावरून भांडण झाले. यावेळी, पेटत्या स्टोव्हवर ढकलण्यात आल्याने वर्षा गंभीर जखमी झाल्या होत्या.
कल्याण : पत्नीच्या हत्याप्रकरणातील आरोपी पती विष्णू कदम (३८, रा. अंबरनाथ) याच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा न मिळाल्याने कल्याण जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. एस. जी. इनामदार यांनी निर्दोष मुक्तता केली.
मे २००५ मध्ये अंबरनाथ येथे राहत असलेल्या वर्षा यांचे पती विष्णू यांच्य्यासोबत किरकोळ कारणावरून भांडण झाले. यावेळी, पेटत्या स्टोव्हवर ढकलण्यात आल्याने वर्षा गंभीर जखमी झाल्या होत्या. पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विष्णू विरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास सुरु करत विष्णूला अटक केली. न्यायालयात विष्णूविरोधात आरोपपत्र दाखल केले गेले. खटल्यात सुनावणी होऊन साक्षीदार तपासले. विष्णूविरोधात सबळ पुरावे सापडले नाही. आरोपी विष्णू याचे तर्फे वरिष्ठ वकील संतोष सोनवणे, वकील सीमा बहिरम व वकील राजेंद्र ताजने यांनी काम पाहिले.