CoronaVirus News: ब्रिटनहून आलेली एक तरुणी कोरोना पॉझिटिव्ह; कल्याण-डोंबिवलीकरांची चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 03:37 PM2020-12-26T15:37:21+5:302020-12-26T15:37:46+5:30

तरुणीच्या स्वॅबचा अहवाल पुण्याला पाठवणार; आरोग्य विभागाची माहिती

woman returned to kalyan dombivali from UK tested corona positive | CoronaVirus News: ब्रिटनहून आलेली एक तरुणी कोरोना पॉझिटिव्ह; कल्याण-डोंबिवलीकरांची चिंता वाढली

CoronaVirus News: ब्रिटनहून आलेली एक तरुणी कोरोना पॉझिटिव्ह; कल्याण-डोंबिवलीकरांची चिंता वाढली

Next

कल्याण- इंग्लंडहून कल्याण डोंबिवली आलेल्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. आत्तापर्यंत २० जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी सात जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर एकाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. टेस्ट पॉझिटिव्ह आलेली रुग्ण ही महिला आहे. तिचा अहवाल आत्ता मुंबईनंतर पुण्याला पाठविला जाणार आहे. टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. पुण्याचा अहवाल काय येतो याकडे कल्याण डोंबिवलीचे लक्ष लागले असून तो अहवाल जर पॉझिटिव्ह आला तर कल्याण डोंबिवलीची चिंता वाढू शकते.

इंग्लंडमध्ये आढळून आलेल्या कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत बदल झालेला आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन दिसून आल्याने खबरदारीचा उपाय योजना म्हणून केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान इंग्लंडहून कल्याण डोंबिवलीत आलेल्या ५५ जणांची यादी महापालिकेस सरकारने दिली होती. या यादीत काही नावे डबल होती. तसेच काही जण हे कल्याण डोंबिवली क्षेत्राबाहेरील होते. त्यानुसार महापालिकेने ४५ जणांचे सर्वेक्षण केले. एकूण ४५ जणांपैकी २० जणांची आरटीपीसीआर चाचणी केली आहे. त्यापैकी सात जणांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे महापालिकेने सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र रात्री उशिरा एका महिलेचा टेस्ट रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. तिचा रिपोर्ट मुंबईतील एनआयव्हीला पाठविला गेला. त्याठिकाणी तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तिचा रिपोर्ट आत्ता पुण्यातील एनआयव्हीला पाठविला गेला आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेली रुग्ण ही १९ वर्षाची तरुणी आहे. तिची प्रकृती स्थिर आहे. तिच्यात इतर कुठलीही लक्षणे दिसून आलेली नाहीत. तिला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे. तिचा अहवाल जनुकीय रचनेच्या तपासणीकरीता पुण्याला  पाठविण्यात आला आहे अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली आहे.

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्या सगल जोडून आलेल्या आहेत. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दी करणे टाळावे. घराबाहेर पडताना न चुकता मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. काही लक्षणे आढळून आल्यास जवळच्या आरोग्य केंद्राशी तातडीने संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

Read in English

Web Title: woman returned to kalyan dombivali from UK tested corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.