रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टने महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने केली ५० देशी झाडांची लागवड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 12:51 PM2024-07-01T12:51:59+5:302024-07-01T13:02:40+5:30
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट यांनी महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी ५० देशी झाडांची लागवड केली.
डोंबिवली: रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट यांनी महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी ५० देशी झाडांची लागवड केली. उंबार्ली टेकडीवर एव्हर ग्रीन सायकल प्रेमी ग्रुप या एमआयडीसी निवासी मधील महिलांच्या संघटनेने वृक्षारोपणाचा कार्यक्रम रविवारी संपन्न।झाला. उंबर्लिमध्ये ४० अशी एकूण ९० देशी जातींची झाडे लावून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पाऊल उचलण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष माधव सिंग, सचिव चक्रपाणी, उमा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली तो कार्यक्रम हभप संत सावळाराम क्रीडा संकुल येथे संपन्न झाला. बदाम, जांभूळ, कडूलिंब, वड, पिंपळ, उंबर, चिंच इत्यादी प्रकारची देशी झाडे लावली गेली. विशेष म्हणजे उंबर्लित यातील बहुतेक महिला या वरिष्ठ नागरिक असून काही महिलांनी तर सायकलींग करून ही टेकडी गाठली. या महिलांनी वृक्षारोपण कार्यक्रमाबरोबरच एक पावसाळी सहल म्हणून मजा केली.
सर्वांनी एकत्र गाणी म्हणून, खेळ खेळून आणि टेकडीवर सायकली फिरून एक आगळा वेगळा आनंद घेतला. या कार्यक्रमाला भास्कर पाटील सोनारपाडा यांच्या टीमने खड्डे खोदणे पासून इतर बरीच मदत केली. स्फूर्ती महिला संस्थेच्या सुनेत्रा दिढे, सरोज विश्वामित्रे, शोभा चौगुले यांनी झाडे उपलब्ध करून दिली. काहीजण दर आठवड्याला एक दिवस ठरवून या टेकडीवर जावून या वृक्षारोपण केलेल्या झाडांची पाहणी करण्यासाठी आणि निगा राखण्यासाठी जाणार असल्याची माहिती पर्यावरण प्रेमी राजू नलावडे यांनी दिली.